demand of packing dry fruits and fancy chocolates for diwali nashik news  
नाशिक

Diwali 2023 : पॅकिंग सुकामेवा, फॅन्सी चॉकलेटची चलती; वस्तूंच्या किमतीत 8 टक्के वाढ

सकाळ वृत्तसेवा

Diwali 2023 : दिवाळीत आप्तेष्टांना भेटवस्तू देण्यासाठी शहरातील विविध दालने सजली आहेत. भेटवस्तू दालनांमध्ये पॅकिंग सुकामेवा, देश विदेशातील फॅन्सी चॉकलेटची चलती आहे. यंदा भेटवस्तूंच्या किमतीत सहा ते आठ टक्के वाढ झाली आहे.

दिवाळीत आप्तेष्ट, शासकीय, खासगी कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांना भेट म्हणून देण्यात येणाऱ्या सुक्यामेव्याचे विविध प्रकार बाजारात असून गत चार दिवसांपासून मागणी वाढली आहे.( demand of packing dry fruits and fancy chocolates for diwali nashik news )

दिवाळीत नातेवाईक, आप्तेष्टांना भेटवस्तू देण्यासाठी काजू, बदाम, मनुका, पिस्ता, अक्रोड, अंजीर आदींचा आकर्षक बॉक्समध्ये सुका मेवा लक्ष वेधून घेत आहे. दिवाळीत विविध चैनीच्या वस्तूंकडे वळणारे ग्राहक आता पॅकेज केलेले चॉकलेट, सुका मेवा, मिठाईकडे वळू लागले आहेत. शहरातील मिठाई उत्पादक आता आकर्षक पॅकेजिंग वापरत असून त्यांची मागणीही दिवाळीत वाढली आहे.

कस्टमाईज्ड गिफ्ट हॅम्पर्सच्या विक्रीतही वाढ झाली आहे. कॉर्पोरेट ग्राहकांना त्यांच्या ग्राहकांसाठी खास डिझाइन केलेले कस्टमाईज्ड गिफ्ट्सची गरज असते. त्यामुळे कस्टमाईज्ड कॉर्पोरेट गिफ्टच्या मागणीत वाढ झाली आहे. भेटवस्तूंमध्ये दिवा कँडल, विविध मिठाईचे पदार्थ, टिफीन बॉक्स, कंटेनर, पेनस्टॅन्ड, विविध देवी-देवतांच्या मूर्ती आदी वस्तूंचीही मागणी आहे.

भेटवस्तूंमध्ये विदेशी चॉकलेटला भाव

रक्षाबंधन, गणेशोत्सव, नवरात्र सणानंतर भेटवस्तूंची दालने सजली आहेत. इटली, चीन, दुबई या देशांतून आलेले चॉकलेट भाव खात आहेत. देशी होममेड चॉकलेटलाही पसंती मिळत आहे. ड्रायफ्रूटचा बॉक्स पाचशेपासून पुढे तर चॉकटलेचा बॉक्स ५० रुपयांपासून हजार रूपयांपर्यंत आहे.

''दिवाळीत फॅन्सी चॉकलेटला सर्वाधिक मागणी आहे. प्रत्येक भेटवस्तूंच्या किमतीत गतवर्षीच्या तुलनेत साधारण आठ टक्के वाढ झाली आहे. ड्रायफ्रुट बॉक्समधील वस्तूंचीही नाशिककरांकडून मागणी जास्त आहे.''-महेंद्र चौधरी, व्यावसायिक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India : सूर्यकुमार यादवसाठी दरवाजे अजूनही खुले... माजी कर्णधाराचे टीम इंडियात पुनरागमन शक्य... जाणून घ्या, कसं!

RBI News: WhatsApp वर RBI चा मेसेज आला? खिशातील रुपया आता मोबाईलमध्ये! डिजिटल रुपया म्हणजे काय आणि तो कसा वापरायचा जाणून घ्या

IND vs ENG 1st ODI: भारत-इंग्लंड सामन्याची वेळ काय?... जाणून घ्या कधी, कुठे अन् कोणत्या चॅनेलवर पाहाल फ्री LIVE मॅच...

Latest Marathi News Live Update : मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय पेरांबूरला भेट देत आहेत

IND vs ENG: 'Lords' वर देव! भारतीय महिला खेळाडूंना मार्गदर्शन करण्यासाठी पोहोचला सचिन तेंडुलकर Video

SCROLL FOR NEXT