godavari express esakal
नाशिक

नाशिककरांची कौटुंबिक गाडी गोदावरी एक्स्प्रेस सुरू करण्याची मागणी

हर्षवर्धन बोऱ्हाडे

नाशिक रोड : नाशिक रोड- मनमाड-नाशिककरांची कौटुंबिक गाडी असणारी गोदावरी एक्स्प्रेस बंद करण्याचा घाट घातला जातो आहे. २२ मार्च २०२० पासून गोदावरी बंद आहे. ही गाडी सुरू करावी, अशी मागणी नाशिककर करीत आहेत. महिनाभरात ही गाडी सुरू न झाल्यास सामान्य नाशिककरांसह प्रवासी संघटना नाशिक रोड आणि मनमाड रेल्वे स्थानकावर आंदोलन करणार असल्याचे नाशिककरांनी सांगितले आहे. यासंदर्भात नाशिक येथील सामाजिक कार्यकर्ते रेल्वे बोर्डाला लेखी पत्र लिहून गोदावरी सुरू करण्याची मागणी करणार आहेत.

सर्वांनाच परवडणारी गाडी

गोदावरी एक्स्प्रेस ही गेल्या अनेक वर्षांची प्रवाशांची लाइफलाइन आहे. नाशिककरांना मुंबईला जाण्यासाठी हक्काच्या तीन गाड्या आहेत. राज्यराणी सकाळी सहाला, पंचवटी सव्वासातला, तर गोदावरी सव्वा नऊला नाशिक रोडला येते. प्रवाशांचा प्रतिसाद निम्म्याने कमी झाल्याचे कारण देत मनमाड-एलटीटी गोदावरी ही नाशिकची फॅमिली रेल्वेगाडी बंद करण्याचा घाट रेल्वे प्रशासनाने घातल्याचा आरोप नाशिककरांनी केला आहे. कोविड कारण दाखवून ही गाडी २२ मार्च २०२० ला बंद करण्यात आली, ती आजपर्यंत सुरु झाली नाही. या गाडीद्वारे सातशे ते आठशे प्रवासी दिवसाला मुंबईला जात होते. याशिवाय पंचवटीनंतर ही गाडी असल्याने या गाडीला जादा गर्दी नसत. व्यावसायिक, महिला आणि विद्यार्थ्यांना ही गाडी परवडणारी होती. आमची हक्काची गाडी गोदावरी एक्स्प्रेस लवकर सुरू करण्यासाठी नाशिककर रेल्वे बोर्डाला लेखी पत्र लिहिणार असल्याचे सामाजिक कार्यकर्त्यांनी सांगितले आहे.

''नाशिककरांच्या हक्काच्या गाड्या पळविल्या जात आहेत. मुंबईला कनेक्ट करणारी गोदावरी एक्स्प्रेस लवकरात लवकर सुरू करावी, अशी मागणी आहे. गोदावरी एक्स्प्रेस महिनाभरात सुरू न झाल्यास प्रवासी संघटनांसह सामाजिक कार्यकर्ते मनमाड व नाशिक रोड रेल्वे स्थानकावर आंदोलन करणार आहे.'' - विजय गांगुर्डे, प्रवासी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain: पश्चिम घाटात यंदा पावसाचा विक्रम! पहिल्या आठ दिवसांत इतका पाऊस का झाला? हवामान तज्ज्ञांनी सांगितले मोठे कारण

महाराष्ट्रात UCC लागू करण्याची तयारी! महायुती सरकारने घेतला मोठा निर्णय; ७ सदस्यीय तज्ज्ञ समिती स्थापन

Mumbai Pune Railway : मुंबई-पुणे रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! मुसळधार पावसामुळे एक्स्प्रेस रद्द, कोणत्या आणि कधीपर्यंत?

Ulhasnagar: कर्तव्यावर असतानाच काळाचा घाला! वायरमनचा विजेच्या धक्क्याने मृत्यू; कुटुंबाला 50 लाखांच्या मदतीची मागणी

OMG : ४७ षटकार...! ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये संघाने कुटल्या ४१७ धावा; ओपनरचे ५४ चेंडूंत द्विशतक, तर दोघांची शतकं... १८८ धावांनी मॅच जिंकली

SCROLL FOR NEXT