farmer esakal
नाशिक

शेतकऱ्यांसाठी तक्रार निवारण कक्ष सुरू

कुणाल संत

नाशिक : यंदाच्या खरीप हंगाम २०२२-२३ करिता शेतकऱ्यांसाठी निविष्ठा, बी- बियाणे, खते, कीटकनाशके याबाबतच्या येणाऱ्या अडचणींचे निराकरण करण्याकरिता नाशिक विभागीय व जिल्हास्तरावर तक्रार निवारण कक्ष स्थापन केल्याची माहिती विभागीय कृषी सहसंचालक नाशिक विवेक सोनवणे यांनी दिली आहे.

खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांकडून बी- बियाणे, खते यांची खरेदी केली जात आहे. मात्र, वितरकांकडून जादा दराने खते, बियाणे यांची विक्री केली जाते. तर अनेकदा माल असूनही त्याची कृत्रिम टंचाई तयार केली जातो. त्यामुळे यासंदर्भातील शेतकऱ्यांच्या तक्रारी दूर करण्यासाठी कृषी विभागाकडून ठोस कारवाई करण्याच्या उद्देशाने तक्रार निवारण कक्ष सुरू करण्यात आला आहे. जिल्ह्यातील शेतकरी बंधू व महिला शेतकऱ्यांना निविष्ठा, बी- बियाणे, खते, कीटकनाशके यांच्या खरेदी व विक्रीबाबत कोणतीही तक्रार असल्यास त्यांना तक्रार निवारण कक्षात करता येणार आहे. यासाठी येथील कक्ष अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संपर्क साधण्याचे विवेक सोनवणे यांनी केले आहे.

येथे करता येणार तक्रार

विभागीय स्तर : दिलीप भोये ( ८२०८६२८१६८)

जिल्हास्तर : जितेश येळवे ( ८२०८५६१९८६)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monsoon Clouds Arabian Sea : मॉन्सूनची चाहूल! गोवा, कर्नाटक, केरळ किनारपट्टीवर मोठे ढग तयार; मुंबईसह उपनगरांत पावसाला सुरूवात

मंदार चांदवडकर नाही तर तारक मेहतामधील भिडे गुरुजीच्या भूमिकेसाठी 'या' मराठी अभिनेत्याला मिळाली ऑफर !

आनंदवार्ता! वाघ संवर्धनाला नवी चालना; ताडोबातील 'झिनत' ने ओडिशात दिला चार शावकांना जन्म

Stock Market Today: अमेरिका-इराण तणावामुळे शेअर बाजार कोसळला! सेन्सेक्स 700 अंकांनी घसरला, कोणते शेअर्स वाढले?

Petrol-Diesel Price: कच्च्या तेलात भावात 7% वाढ झाल्यानंतर देशात पेट्रोल-डिझेलचे नवे दर लागू! पाहा तुमच्या जिल्ह्यातील ताजे दर

SCROLL FOR NEXT