नाशिक

धमनार विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा

CD
धमनार सोसायटीची वार्षिक सभा खेळीमेळीत सभासदांच्या गुणवंत पाल्यांचा मान्यवरांकडून गौरव सकाळ वृत्तसेवा म्हसदी, ता. २१ : धमनार (ता. साक्री) येथील धमणार विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा चेअरमन ज्ञानेश्वर नथू बच्छाव यांच्या अध्यक्षतेखाली झाली. सभेत आर्थिक अंदाजपत्रक, लेखापरीक्षण अहवालाचे वाचन करून अंदाजपत्रकास मंजुरी देण्यात आली. विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. लिपिक प्रकाश पाटील यांनी प्रास्ताविक केले. अविनाश खैरनार यांनी सूत्रसंचालन केले. चर्चेत राजेंद्र बच्छाव, माजी सरपंच भिलाजी सोनवणे, हिम्मत सोनवणे यांनी सहभाग घेतला. दुष्काळी परिस्थितीचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना सोसायटीच्या माध्यमातून शक्यती मदत करण्यात यावी, अशी मागणी या वेळी करण्यात आली. सोसायटीच्या माध्यमातून झालेल्या विविध चांगल्या कामांचे कौतुक करत संचालक मंडळाचे कौतुक करण्यात आले. संचालक मंडळाने सभासदांच्या विधायक सूचनांचे स्वागत करून सर्व विषयांवर चर्चा घडवून आणली. या वर्षीपासून सोसायटीच्या वतीने गावातील गुणवंत पाल्य, विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्ती, तसेच विविध पुरस्कारप्राप्त मान्यवरांचा सत्कार करण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला. उपक्रमांतर्गत तलाठी पाटील यांनी रक्तदान करून एका महिलेचे प्राण वाचविल्याबद्दल, गौतम पगारे यांचा वृक्षारोपण क्षेत्रातील कार्याबद्दल, रवींद्र पाटील, निवृत्त सचिव, रोशनी सोनवणे यांची पवित्र पोर्टलद्वारे पालघर जिल्ह्यात शिक्षिका म्हणून निवड झाल्याबद्दल, डॉ. पल्लवी सोनवणे यांनी वैद्यकीय क्षेत्रात एम. डी. पदवी संपादन केल्याबद्दल, दीपाली सोनवणे यांची माध्यमिक शिक्षिका व रजनीश काकूळते प्राथमिक शिक्षक म्हणून निवड झाल्याबद्दल रेखा जाधव यांना ‘निसर्ग मित्र’ पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. गावातील शंभर टक्के पीक पाहणी लावण्याच्या उपक्रमाबद्दल निलेश मोरे यांचाही या वेळी सत्कार करण्यात आला. स्वप्निल सोनवणे यांनी सोसायटीचा हा उपक्रम आदर्श व प्रेरणादायी असल्याचे सांगितले. धमनार येथील प्राथमिक शिक्षक तथा साक्री तालुका पदवीधर शिक्षक संघटनेचे अध्यक्ष विलास सोनवणे यांनी पुरस्कारामुळे नव्या पिढीला प्रेरणा मिळत असल्याचे सांगितले. मातोश्री (स्व.)अंजीरा उत्तमराव सोनवणे यांच्या स्मरणार्थ धमणार गावातील दहावीच्या परीक्षेत दरवर्षी प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यास अकरा हजार एकशे अकरा रुपये पारितोषिक देण्याची घोषणा केली. सभेस संस्थेचे उपाध्यक्ष दगा काकुळते, संचालक अनिल वाघ, विनायक पाटील, कालिदास पाटील, नानासाहेब पाटील, भीमराव देसले, सखाराम कारंडे, हेमंत पाटील, संभाजी पाटील, अनिल पवार, सुनंदाबाई पाटील, लता वाघ, जितेंद्र खैरनार, सचिव उमेश चौधरी, प्रवीण बच्छाव, जिभाऊ सोनवणे यांच्यासह सभासद व ग्रामस्थ उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Kisan Samman Nidhi: दिवाळीपूर्वी पीएम किसानचे २,००० रुपये मिळणार शेतकऱ्यांना मिळणार का? २४व्या हप्त्याबाबत महत्त्वाची अपडेट

Shark Tank USA: भारतीय तरुणाचा अमेरिकेत डंका! फक्त 2 चमच्यांच्या आयडियासाठी मिळाली ₹3.3 कोटींची ऑफर

Asian Para Games : नाशिकच्या Dilip Gavitची 'सुवर्ण' धाव! सिमरनने स्पर्धा विक्रमासह जिंकले गोल्ड; भारताचे पदकांचे अर्धशतक...

Latest Marathi News Live Update : पुणे पदवीधर मतदारसंघ निवडणूक, मतदानासाठी कर्मचाऱ्यांना चार तासांची विशेष सवलत

SA vs AUS 2nd Test : दक्षिण आफ्रिकेने 'फास' आवळला! रबाडाच्या 154.5 kph वेगाच्या चेंडूने हेड हडबडला... यान्सेनने करेक्ट कार्यक्रम केला

SCROLL FOR NEXT