नाशिक

एक हजार नवीन रोहित्र

CD
धुळे : टुडे पान १ साठी.. अँकर -- दुष्काळात प्रत्येक जिल्ह्याला एक हजार नवीन रोहित्र -- राज्य शासनाचा निर्णय; धुळे जिल्ह्यास लाभ, बळीराजाला मोठा दिलासा सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. २५ : राज्यात निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने धुळे जिल्ह्यासह राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. शेतीसाठी अखंडित वीजपुरवठा आणि ग्रामीण भागातील वीजयंत्रणा सक्षम करण्यासाठी जिल्हा नियोजन व विकास समिती (डीपीडीसी) अंतर्गत प्रत्येक जिल्ह्यासाठी २० कोटी रुपयांपर्यंतचा विशेष निधी मंजूर करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्य शासनाने या धोरणात्मक प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. - यंदाच्या कमी पर्जन्यमानामुळे राज्यातील ३५८ तालुक्यांपैकी तब्बल ३०५ तालुक्यांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर झाली असून, याचा फटका धुळे जिल्ह्यालाही बसला आहे. सध्या महावितरणतर्फे राज्यातील ४७ लाखांहून अधिक कृषी ग्राहकांना विविध क्षमतेच्या रोहित्रांद्वारे वीजपुरवठा केला जातो. या कठीण काळात पिकांना वेळेवर पाणी मिळावे आणि सिंचनात कोणताही अडथळा येऊ नये, यासाठी धुळे जिल्ह्यासह राज्यभरात वीज वितरण यंत्रणेच्या सक्षमीकरणाची कामे युद्धपातळीवर राबवण्याचे आदेश दिले आहेत. - या सर्व कामांना गती देण्यासाठी जिल्ह्यासह सर्व संबंधित महावितरण अधीक्षक अभियंता कार्यालयामार्फत तांत्रिक तपासणी करून अंदाजपत्रक तयार केले जाईल. शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी या कामांना तातडीने प्रशासकीय मान्यता देण्याचे पूर्ण अधिकार सर्व जिल्हाधिकाऱ्यांना प्रदान करण्यात आले आहेत. तसेच, मंजूर निधीच्या खर्चाचा अहवाल विहित कालावधीत जिल्हाधिकाऱ्यांना सादर करणे महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांना बंधनकारक राहील. शासनाच्या या निर्णयामुळे धुळे जिल्ह्यासह राज्यातील लाखो शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून, ग्रामीण भागातील महावितरणची यंत्रणा अधिक मजबूत होणार आहे. - निधीतून होणारी मुख्य कामे शासनाच्या या विशेष निधीतून राज्य आणि जिल्हा स्तरावर तीन मुख्य कामे तातडीने केली जाणार आहेत. नादुरुस्त किंवा अतिभारित (ओव्हरलोड) रोहित्र बदलण्यासाठी प्रत्येक जिल्ह्याला आवश्यकतेनुसार एक हजार नवीन वितरण रोहित्र उपलब्ध करून दिले जातील. तसेच कृषी वीजवाहिनीवरील घरगुती ग्राहक आणि शेतातील घरांना २४ तास सुरळीत वीज मिळण्यासाठी सिंगल फेज आणि थ्री-फेजचे नवीन ‘स्पेशल डिझाईन ट्रान्सफॉर्मर’ बसवले जातील. यासोबतच लांब अंतराच्या वीजवाहिन्यांवरील कमी दाबाच्या (लो-व्होल्टेज) समस्येवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी नवीन कॅपॅसिटर बँका खरेदी केल्या जाणार आहेत. -

Dilip Walse Patil: कर्जतमधील वृक्षतोडीचा भीमाशंकर अभयारण्याशी संबंध नाही; दिलीप वळसे पाटलांचे स्पष्टीकरण

Solapur Crime: मेहुणीला शिक्षणासाठी घरी आणलं, पत्नी असताना तिच्यासोबत लग्न केलं अन्...; सासऱ्याने घडवला रक्तरंजित थरार

VIDEO : मल्लिकार्जुन खरगेंचं वादग्रस्त वक्तव्य; PM मोदींबद्दल बोलताच कार्यक्रमात गोंधळ, काँग्रेस कार्यकर्त्यांकडून एकाला मारहाण, नेमकं काय घडलं?

Madhuri Dixit Kon Honaar Karodpati : "बाई, तुम्ही खूप कडक बोलताय..."; शिक्षिकेसमोर थेट विद्यार्थी बनली माधुरी दीक्षित! 'कोण होणार करोडपती'मधील सुंदर क्षणाचा व्हिडिओ व्हायरल!

Latest Marathi News Update : चौकशीपूर्वीच रुग्णालयातून धूम ठोकून राणा सूर्यवंशी पसार! बारामती हल्ला प्रकरणात खळबळ, पोलिसांकडून शोध सुरू

SCROLL FOR NEXT