नाशिक

धुळे गरबा महोत्सव

CD
धुळे : टुडे पान २ साठी.. -- फोटो क्रमांक : 33333 धुळे : धुळे गरबा महोत्सवमधील विजेत्या महिला स्पर्धकाला बक्षीस प्रदान करताना आयोजक नगरसेवक ललित माळी. -- धुळे गरबा महोत्सवात महिलांची धूम -- नऊ दिवस उत्साहात रंगला नवरात्रोत्सव; बक्षिसांची लयलूट सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. २३ : नवरात्रीचा उत्साह, स्त्रीशक्तीचा सन्मान आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश यांचा मिलाफ साधणारा ‘धुळे गरबा महोत्सव २.०’ उत्साहात झाला. ‘एक पाऊल पुढे या वर्षासाठी, एक संधी तुमच्या कलागुणांसाठी’ या संकल्पनेवर आधारित या महोत्सवाला धुळेकर महिलांचा भरभरून प्रतिसाद लाभला. या सोहळ्यास पालकमंत्री जयकुमार रावल, आमदार अनुप अग्रवाल, भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर, माजी आमदार कुणाल पाटील यांचे मार्गदर्शन झाले. नगरसेवक तथा आयोजक ललित माळी आणि हरीश माळी यांच्या नियोजनासह संकल्पनाकार प्रियंका माने यांच्या कल्पकतेतून हे व्यासपीठ साकारले गेले. केवळ महिलांसाठी राखीव असलेला गरबा मंडप हे या महोत्सवाचे मुख्य वैशिष्ट्य होते. पुरुषांना प्रवेश नसल्याने महिलांनी सुरक्षित वातावरणात गरब्याचा आनंद लुटला. विनामूल्य प्रवेशामुळे सर्व स्तरांतील महिलांना कलागुण सादर करण्याची संधी मिळाली. महोत्सवापूर्वी पाच दिवसांच्या गरबा वर्कशॉपमुळे महिलांच्या सादरीकरणाला नवी दिशा मिळाली. - बक्षिसांची लयलूट ११ ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या या महोत्सवात लाईव्ह बँड, लाईव्ह ऑर्केस्ट्रा आणि भव्य लाईट शोने प्रत्येक संध्याकाळ रंगवून टाकली. सहभागी महिलांसाठी एलईडी टीव्ही, पैठणी साड्या व गृहोपयोगी वस्तूंसह ५०० हून अधिक बक्षिसे देण्यात आली. १८ ऑक्टोबरला झालेल्या ग्रँड फॅशन शोमध्ये ‘मिस धुळे’ आणि ‘मिसेस धुळे’ किताब प्राप्त करणाऱ्या महिलांचा गौरव करण्यात आला. संस्कृती जपतानाच वृक्षसंवर्धनाचा संदेश देणारा हा महोत्सव धुळेकरांसाठी विशेष ठरला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jio IPO: जिओ प्लॅटफॉर्म्स आयपीओचा जागतिक महाविक्रम; १ कोटींहून अधिक अर्जांचा टप्पा ओलांडणारा जगातील पहिलाच आयपीओ

Manoj Jarange Patil : कथित ५०० कोटींच्या व्यवहाराची एसआयटीमार्फत निष्पक्ष चौकशी करा; मराठा आंदोलनाबाबतच्या आरोपांवर मनोज जरांगे-पाटील यांची मागणी

WHO IS JINTIMANI KALITA?: कोण आहे जिंतिमणी कलिता? झिम्बाब्वेविरुद्ध भारताकडून आंतरराष्ट्रीय पदार्पण, हरमनप्रीत कौरने दिली खास कॅप

Marathi News Live Updates: नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक; दुपारी २ वाजेपर्यंत ३८.८८ टक्के मतदान

Nilanga News : निलंगा तालुक्यात रेशनधारकांना दुष्काळात तेरावा महिना; गोदामातूनच ५० किलोच्या कट्ट्यात मिळतोय ४५ ते ४६ किलो धान्यसाठा

SCROLL FOR NEXT