नाशिक

पथविक्रेता समिती बैठक

CD
धुळे टुडे १ साठी... --- फोटो-NSK26H33304 धुळे : महापालिकेत पथविक्रेता समितीच्या आढावा बैठकीला उपस्थित समिती सदस्य, अधिकारी- कर्मचारी. --- पथविक्रेता समितीची मनपात आढावा बैठक --- नियमावलीबाबत सविस्तर चर्चा सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. २२ : शहरातील पथविक्रेता समितीची गुरुवारी (ता. २२) महापालिकेत आढावा बैठक झाली. बैठकीत पथविक्रेत्यांनी नियमाप्रमाणे आपला व्यवसाय करण्याबाबत सदस्यांशी चर्चा झाली. महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त करुणा डहाळे बैठकीच्या अध्यक्षस्थानी होत्या. केंद्र शासनाने सन २०१४ मध्ये पथविक्रेता अधिनियम प्रसिद्ध केला असून, महाराष्ट्र शासनाने ९ जानेवारी २०१७ रोजी पथविक्रेता योजना व समितीचा मसुदा जाहीर केला होता. याच पार्श्वभूमीवर सन २०२६ चा अंतिम मसुदा मंजूर करण्याच्या दृष्टीने बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. पथविक्रेत्यांसाठी योग्य आणि सुटसुटीत नियमावली तयार करून त्यानुसारच विक्रेत्यांनी आपला व्यवसाय करावा, याबाबत बैठकीत उपस्थितांशी सविस्तर चर्चा करण्यात आली. बैठकीत समाज विकास अधिकारी मीना सातभाई यांनी पथविक्रेता समितीच्या मसुद्याचे वाचन करून उपस्थितांना माहिती दिली. या आढावा बैठकीस नितीन बंग, जयश्री शहा, खिमजी पटेल, कविता पवार, पोलिस उपनिरीक्षक प्रशांत महाले, चंद्रकांत सोरमारे, ज्योती कोळी, अंजुम शहा आदी उपस्थित होते. सुनील सरदार, धम्मदीप सावंत, छाया पाटील, सुनीता निकम यांचे सहकार्य लाभले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

उत्तराखंडमधील मदरशांची शुक्रवारची सुट्टी रद्द? आता रविवारची साप्ताहिक सुट्टी लागू करण्याचा निर्णय

Latest Marathi News Live Update : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कॅप्टन स्मित मच्छर यांना इस्रायलच्या स्वातंत्र्यदिन सोहळ्याचे निमंत्रण

Annamalai News: CJPचे समर्थन, भाजपला खडे सवाल! काय म्हणाले अण्णामलाई?

GURU GOCHAR: ३१ ऑक्टोबरला गुरू ग्रहाचं गोचर; पुढचे ३ महिने ‘या’ राशींच्या लोकांसाठी ठरू शकतात खास, पैसा आणि करिअरमध्ये मिळतील नव्या संधी?

Muhurat Trading 2026: दिवाळीला शेअर बाजार उघडणार! मुहूर्त ट्रेडिंगची वेळ जाहीर; BSE-NSE चं संपूर्ण वेळापत्रक पाहा

SCROLL FOR NEXT