धुळे ः टुडे १ साठी
--
सूचना ः झेंडूचे दर घसरले ही बातमी जागेनुसार बसत असली तर ठिक अन्यथा टुडे २ किंवा मुख्य अंकात द्यावी....त्याऐवजी चर्चेची ही बातमी टुडे १ वर घ्यावी....
--
फोटो क्रमांक ः 33064
धुळे : वर्दळीच्या संतोषीमाता चौकात वाहतूक पोलिसाला मारहाण करताना तरूण.
--
वाहतूक पोलिसाची कॉलर पकडली
-
मोबाईलवर बोलण्यास रोखल्याने तरुणाची अरेरावी
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. १९ : वाहन चालविताना मोबाईलवर बोलण्यास रोखल्याने तरुणाने वाहतूक पोलिसाशी हुज्जत घालत त्यांच्या गणवेशाची कॉलर पकडून धक्काबुक्की केली. ही घटना सोमवारी (ता. १९) सकाळी पावणेअकराच्या सुमारास संतोषीमाता चौकात घडली. याप्रकरणी मोहन संजय घाडगे (वय २१, रा. वखारनगर, कॉटन मार्केटमागे, धुळे) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला. त्यामुळे शहरातील गुंडगिरीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.
वाहतूक शाखेचे सहायक पोलिस उपनिरीक्षक रवींद्र आधार ठाकरे आणि अंमलदार राहुल चौधरी यांची संतोषीमाता चौकात कर्तव्यावर नियुक्ती होती. त्या वेळी घाडगे हा दुचाकीवरून (एमएच १८ बीवाय ३४४५) साक्री रोडकडून सिव्हिल हॉस्पिटलकडे जाताना मोबाईलवर बोलत असल्याचे ठाकरे यांच्या निदर्शनास आले. त्यांनी शिटी वाजवून त्याला वाहन बाजूला घेण्यास सांगितले. त्यानंतर घाडगे याने मोबाईलमधून पोलिसांचे चित्रीकरण सुरू केले. मोठ्याने आरडाओरड करीत, ‘माझ्या गाडीवर पाच हजार रुपये दंड टाका, तुम्हाला वाटेल ती केस करा,’ असे म्हणत त्याने हुज्जत घातली. तसेच ठाकरे यांच्या शासकीय गणवेशाची कॉलर पकडून धक्काबुक्की, मारहाण केली आणि शासकीय कर्तव्यात अडथळा आणला. सहायक पोलिस उपनिरीक्षक रवींद्र ठाकरे यांच्या फिर्यादीनुसार ही कारवाई करण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.