धुळे ः टुडे १ साठी, संक्षीप्त...........टुडे १ ला हाफ पेज जाहिरात आहे....माहितीस्तव
--
महिलेच्या मृत्यूप्रकरणी
पाच जणांविरुद्ध गुन्हा
धुळे : धामणगाव (ता. धुळे) येथे सामायिक शेतीची खातेफोड करून शेत नावावर करून घेण्याच्या कारणावरून चंद्रकला ज्ञानेश्वर पाटील (वय ४५) यांना आठ महिन्यांपासून मानसिक त्रास दिल्याच्या संशयावरून पाच जणांविरुद्ध धुळे तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. याबाबत त्यांचा मुलगा समाधान ज्ञानेश्वर पाटील (रा. धामणगाव, ता. धुळे) याच्या फिर्यादीनुसार या त्रासाला कंटाळून चंद्रकला पाटील यांनी सहा ऑक्टोबरला सकाळी आठ ते साडेनऊदरम्यान शेतात आत्महत्या केली. याप्रकरणी संशयित धुडकू बळीराम पाटील, संगीताबाई धुडकू पाटील, रामकृष्ण धुडकू पाटील (तिघे रा. धामणगाव), शोभाबाई बन्सीलाल पाटील (रा. अवधान) आणि सुरेखाबाई काशीनाथ पाटील (रा. विंचूर, ता. धुळे) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला.
-
पवनचक्कीवरून पडून
तरुणाचा मृत्यू
धुळे : दुसाणे (ता. साक्री) येथील जिगर राजू लांडगे (वय २५) याचा पवनचक्कीवरून उतरताना पाय घसरून पडल्याने मृत्यू झाला. ही घटना १२ ऑक्टोबरला सायंकाळी सहाच्या सुमारास टिटाणे शिवारात घडली. लांडगे पवनचक्कीवर काम करीत होता. काम आटोपून खाली उतरताना लोखंडी प्लेटवरून पाय घसरल्याने तो खाली पडला. डोक्याला व पायाला गंभीर दुखापत झाल्याने तो बेशुद्ध झाला. स्थानिकांच्या मदतीने त्याला जैताणे ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. या प्रकरणी निजामपूर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली.
-
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.