धुळे : मुख्य अंकातील पानासाठी....मेन
--
सेवा संकल्पातून ३८ हजार विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी
--
आश्रमशाळा व वसतिगृहांतील विद्यार्थ्यांच्या आरोग्याला बळ; विविध आजारांवर उपचार
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. १५ : मुलांचे शिक्षण जितके महत्त्वाचे आहे, तितकेच त्यांचे आरोग्यही सुदृढ असणे आवश्यक आहे. आश्रमशाळा आणि वसतिगृहांमध्ये राहून शिक्षण घेणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या आरोग्यात सुधारणा व्हावी व आजारपणामुळे त्यांच्या शिक्षणात अडथळे येऊ नयेत, या उद्देशाने जिल्ह्यात सेवा संकल्प अभियानांतर्गत विशेष आरोग्य तपासणी मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत जिल्ह्यातील ३८ हजार ५०० विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आल्याची माहिती एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पचे प्रकल्प अधिकारी प्रमोद पाटील यांनी दिली.
-
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यांच्या पुढाकारातून २३ सप्टेंबरपासून जिल्ह्यात ही विशेष मोहीम सुरू करण्यात आली होती. या अभियानांतर्गत जिल्ह्यातील २२ शासकीय आश्रमशाळा, ४१ अनुदानित आश्रमशाळा आणि २९ वसतिगृहांमधील विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली. याशिवाय परिसरातील नामांकित व एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांनाही या मोहिमेत सामावून घेण्यात आले.
-
आरोग्यसेवा पोहोचली दारी
ग्रामीण आणि दुर्गम आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळा व वसतिगृहाच्या आवारातच ही वैद्यकीय सुविधा मिळाल्यामुळे पालकांनी समाधान व्यक्त केले आहे. विद्यार्थ्यांना वेळेत वैद्यकीय उपचार मिळाल्यास त्यांचे आरोग्य सुदृढ राहील आणि त्यांचा शिक्षणातील सहभाग अधिक प्रभावी होईल, या दृष्टिकोनातून ही मोहीम राबवली जात आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षणासोबतच आरोग्य उत्तम राहणे गरजेचे आहे. ‘निरोगी विद्यार्थी, सक्षम विद्यार्थी’ या संकल्पनेतून सेवा संकल्प अभियानांतर्गत हा उपक्रम हाती घेण्यात आला. यापुढेही तपासणीत आढळलेल्या गरजू विद्यार्थ्यांना पुढील उपचारासाठी आवश्यक ते सर्व वैद्यकीय सहाय्य व मार्गदर्शन पुरवले जाईल, अशी माहिती प्रकल्प अधिकारी पाटील यांनी दिली.
-
१४-१
..चौकट..
१४-१
सिकलसेल, रक्तक्षयावर विशेष भर
या मोहिमेत केवळ नियमित तपासणी न करता विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी संबंधित गंभीर बाबींवर लक्ष केंद्रित करण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने सिकलसेल, रक्तक्षय, रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण आणि इतर महत्त्वाच्या शारीरिक घटकांची तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान ज्या विद्यार्थ्यांमध्ये आरोग्यविषयक समस्या किंवा त्रुटी आढळल्या, त्यांना तातडीने वैद्यकीय सल्ला व पुढील उपचारांसाठी डॉक्टरांचे मार्गदर्शन उपलब्ध करून दिले जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.