नाशिक

वंदे मातरम् प्रतिष्ठानला सर्वोच्च बहुमान

CD
धुळे ः टुडे १ साठी -- (तीन कॉलमसाठी) फोटो क्रमांक ः 33061 मुंबई ः रवींद्र नाट्यमंदिरातील सोहळ्यात राज्य शासनाच्या सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धेतील धुळे जिल्ह्याचा प्रथम पुरस्कार सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते स्वीकारताना वंदे मातरम् प्रतिष्ठानचे पदाधिकारी. - वंदे मातरम् प्रतिष्ठानला सर्वोच्च बहुमान - गणेशोत्सव स्पर्धेत जिल्ह्यात प्रथम; मंत्र्यांकडून मुंबईत गौरव - सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. १९ ः गणेशोत्सवाच्या माध्यमातून केवळ धार्मिक विधी न करता प्रभावी समाजप्रबोधन आणि विविध सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम राबवून सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या येथील इंदिरा गार्डन परिसरातील वंदे मातरम् प्रतिष्ठानने मोठी कामगिरी बजावली आहे. राज्य शासनाच्या सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धा २०२६ मध्ये या प्रतिष्ठानने धुळे जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकाविला आहे. या ऐतिहासिक यशाबद्दल प्रतिष्ठानचा गौरव सोहळा मुंबईतील प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिर येथे पार पडला. राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत आयोजित या सोहळ्यात राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते वंदे मातरम् प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांना सन्मानचिन्ह, गौरवपत्र आणि पारितोषिकाची रोख रक्कम प्रदान करून सन्मानित करण्यात आले. उत्सवाचे शिस्तबद्ध नियोजन, विविध उपक्रमांमधील नावीन्यपूर्णता, सामाजिक व शैक्षणिक कार्य आणि सर्वसामान्य नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग या निकषांवर शासनाने प्रतिष्ठानची निवड केली. या पुरस्कारामुळे वंदे मातरम् प्रतिष्ठानच्या सातत्यपूर्ण कार्याला शासनस्तरावर मान्यता मिळाली आहे. या यशाबद्दल आनंद व्यक्त करताना प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले, की हा पुरस्कार म्हणजे प्रत्येक कार्यकर्त्याची मेहनत, सामाजिक बांधीलकी आणि धुळेकरांच्या सहकार्याची पावती आहे. या सन्मानामुळे भविष्यात आणखी व्यापक स्वरूपात समाजोपयोगी काम करण्याची प्रेरणा मिळाली आहे. शासकीय स्पर्धेतील या यशामुळे वंदे मातरम् प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांचा उत्साह वाढला असून, धुळे शहरासह जिल्हाभरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP च्या नेत्यांच्या अडचणीत वाढ; जंतरमंतर आंदोलन प्रकरणी आशुतोष रांका आणि सौरव दास यांना न्यायालयीन धक्का!

Tiger Shroff Firing Case : टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणातील आरोपींना पकडणाऱ्या कोण आहेत आयपीएस तेजस्विनी गौतम?

Rain Update : दक्षिण भारतात मुसळधार पावसाचा हाय अलर्ट! तर महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट जारी!

Bishnoi Gang Update : टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणानंतर मोठी खळबळ; लॉरेन्स बिश्नोई गँगच्या निशाण्यावर होते 'हे' काँग्रेसचे माजी आमदार!

Latest Marathi News Live Update : महायुतीला धक्का! फेरमतमोजणीची मागणी फेटाळली, सतेज पाटलांच्या समविचारी १३ तर महायुतीला १२ जागा

SCROLL FOR NEXT