नाशिक

मतदार नोंदणी शिबिरे

CD
धुळे : टुडे पान २ साठी.. -- जिल्ह्यात मतदार नोंदणीसाठी विशेष शिबिरे -- नोंदणीची २४ व २५ ऑक्टोबरला नवमतदारांना संधी -- सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. २२ : लोकशाही प्रक्रियेत पहिल्यांदाच सहभागी होणाऱ्या युवक- युवतींसाठी मतदार यादीत नाव नोंदविण्याची संधी उपलब्ध झाली आहे. भारत निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) २०२६ कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात शनिवारी (ता. २४) व रविवारी (ता. २५) विशेष मतदार नोंदणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व पात्र नवमतदारांनी या शिबिरांचा लाभ घेऊन मतदार यादीत आपले नाव नोंदवावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी भाग्यश्री विसपुते यांनी केले आहे. - भारत निवडणूक आयोगाने मतदार याद्या अधिक अचूक आणि अद्ययावत करण्यासाठी हा कार्यक्रम हाती घेतला आहे. याअंतर्गत दावे व हरकती सादर करण्यासाठी २८ ऑक्टोबर ते २६ नोव्हेंबर हा कालावधी निश्चित करण्यात आला असून, अंतिम मतदार यादी २८ डिसेंबरला प्रसिद्ध होणार आहे. या प्रक्रियेची पूर्वतयारी म्हणून जिल्ह्यातील संबंधित सर्व मतदान केंद्रांवर मतदार केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांच्या माध्यमातून ही शिबिरे पार पडणार आहेत. - या विशेष शिबिरांमध्ये नवीन मतदार नोंदणीसह मतदार यादीतील नावांची पडताळणी, आवश्यक दुरुस्ती तसेच विविध अर्ज भरण्यासाठी थेट मार्गदर्शन मिळणार आहे. मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदार यादीत नाव समाविष्ट असणे आवश्यक आहे. त्यामुळे १८ वर्षे पूर्ण केलेल्या नवमतदारांनी या शिबिरांकडे लोकशाहीतील आपल्या सहभागाची महत्त्वाची संधी म्हणून पाहावे आणि आपली नोंदणी पूर्ण करून घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी विसपुते यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local : कसारा मार्गावरील प्रवाशांसाठी खुशखबर! गर्दीचा ताण कमी होणार; १५ डब्यांच्या लोकल धावणार

Shiva Sharma Death Case : २२०० किमीचा थरार, १० दिवस पोलिसांना चकवा; नेपाळ ते नागपूर पळणाऱ्या मॉडेल श्रद्धा दुबेला अखेर बेड्या

Nitesh Karale : पदवीधर निवडणुकीपूर्वी नितेश कराळे गुरुजींना धक्का; राष्ट्रवादीतून सहा वर्षांसाठी हकालपट्टी, नेमकं काय घडलं?

Latest Marathi News Live Update : मनोज जरांगेंच्या ऑडियो क्लिपमधील आवाज कुणाचे? नरेश म्हस्केंनी थेट नावेच घेतली!

Pune News: ‘नशामुक्त भारत’साठी समाजाने पुढे यावे; पोलिस आयुक्त अमितेश कुमार

SCROLL FOR NEXT