नाशिक

धुळे मतदार यादी प्रश्‍न

CD
धुळे ः टुडे १ साठी, ॲंकर -- धुळ्यात मतदार पुनर्रचना प्रक्रियेत पारदर्शकता आणावी - माजी सभापती मुंदडा यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी; अनपेक्षित नोटीसांमुळे संभ्रम - सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. १९ : विशेष सखोल मतदार पुनरीक्षण (एसआयआर) प्रक्रियेत धुळे शहरातील आनंदीबाई जावडेकर संस्कार मंदिर केंद्राच्या भाग क्रमांक १२८ व १२९ मधील मतदारांना बजावण्यात आलेल्या नोटिसा आणि मोठ्या प्रमाणातील वगळणीबाबत माजी स्थायी समिती सभापती अनिल मुंदडा यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे निष्पक्ष चौकशीची मागणी केली आहे. प्रशासकीय प्रक्रियेत कोणताही पात्र मतदार मतदानाच्या अधिकारापासून वंचित राहू नये, अशी आक्रमक भूमिका त्यांनी घेतली आहे. - नेमका मुद्दा काय? धुळे महापालिका क्षेत्रातील आनंदीबाई जावडेकर संस्कार मंदिर मतदान केंद्राच्या भाग क्रमांक १२८ आणि १२९ मध्ये विशेष सखोल मतदार पुनरीक्षण मोहीम राबविण्यात आली. बूथ लेव्हल ऑफिसर (बीएलओ) यांनी घरोघरी जात प्रत्यक्ष सर्वेक्षण केले आणि माहिती संकलित केली. मात्र, या प्रक्रियेनंतर दोन्ही भागांतील मिळून तब्बल ८६९ मतदार संबंधित पत्त्यावर आढळून आले नसल्याची नोंद समोर आली आहे. तसेच सुमारे ५३९ नागरिकांना भारतीय नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी अनपेक्षितपणे नोटिसा बजावल्याने नागरिकांमध्ये तीव्र संभ्रम व चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. - निवेदनातील प्रमुख मुद्दे भाग १२८ ची स्थिती- पुनर्रचनापूर्वी १,३०० मतदार असलेल्या या भागात ४१० मतदार पत्त्यावर आढळले नाहीत. पडताळणीनंतर सध्या ८९० मतदार नोंदवले गेले असून, यातील २१४ जणांना नागरिकत्वाची नोटीस बजावण्यात आली आहे. भाग १२९ ची स्थिती- पुनर्रचनापूर्वी १,२५२ मतदार असलेल्या या भागात ४५९ मतदार अनुपस्थित असल्याचे नमूद करून, सध्या ७९३ मतदार अंतिम यादीत आहेत. या भागातील सुमारे ३२५ नागरिकांना नोटिसा दिल्या आहेत. ७८ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचा प्रश्न- गेली ५५ वर्षे सातत्याने मतदान करणाऱ्या आणि मतदार यादीत नाव असलेल्या ७८ वर्षीय ज्येष्ठ नागरिकालाच नागरिकत्वाची नोटीस मिळाल्यामुळे कुटुंबात तीव्र नाराजी आहे. अशा ज्येष्ठ नागरिकांच्या जुन्या नोंदींची संवेदनशीलतेने पडताळणी करण्याची मागणी करण्यात आली आहे. - प्रशासनाकडे मागण्या बीएलओच्या सर्वेक्षणातील निष्कर्ष आणि त्यानंतर वरिष्ठ स्तरावर बजावण्यात आलेल्या नोटिसा यामध्ये मोठी विसंगती असून, हा निर्णय कोणत्या निकषांवर घेतला गेला, याचा खुलासा श्री. मुंदडा यांनी मागितला आहे. त्यात नोटिसा बजावण्यामागील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे निर्देश, कायदेशीर तरतुदी आणि निकषांची निष्पक्ष चौकशी करणे, दोन्ही भागांतील ५३९ नोटीसधारकांची प्रकरणनिहाय तपासणी करून प्रत्येक नागरिकाला त्याचे नेमके कारण स्पष्ट करणे, दुबार नोंदणी, मृत्यू किंवा स्थलांतरित झालेल्यांची अधिकृत पुराव्यांच्या आधारे खात्री करणे, पात्र ज्येष्ठ नागरिकांना अनावश्यक त्रास होऊ न देता त्यांची नावे मतदारयादीत कायम राखणे, अशी मागणी त्यांनी केली आहे. - १४-१ ...कोट... १४-१ फोटो क्रमांक ः 32706....अनिल मुंदडा १४-१ मतदारयादी अचूक व पारदर्शक असावीच. परंतु, प्रशासकीय त्रुटी किंवा अपुऱ्या माहितीमुळे एकाही पात्र नागरिकाचा मताधिकार हिरावला जावा, असा कुठलाही प्रकार खपवून घेतला जाणार नाही, अशी ठाम भूमिका आहे. या प्रकरणी तातडीने सुधारात्मक व न्याय्य कार्यवाही करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. - अनिल मुंदडा, माजी सभापती, महापालिका स्थायी समिती, धुळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bishnoi Gang Update : टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणानंतर मोठी खळबळ; लॉरेन्स बिश्नोई गँगच्या निशाण्यावर होते 'हे' काँग्रेसचे माजी आमदार!

Bhagwangad News : भगवानगडाच्या चतुर्थ महंतपदी कृष्णा महाराज शास्त्री विराजमान होणार; दुष्काळामुळे सोहळा साधेपणाने

Law Courses : विधी अभ्यासक्रमाला मुलींची पसंती; प्रवेशाचे प्रमाण ४३.३८ टक्क्यांवर

IND vs NZ, Schedule: भारताचा T20 संघ न्यूझीलंडला पोहोचला! वैभव सूर्यवंशीसोबत फॅन्सने घेतले सेल्फी, भुवीही कमबॅकसाठी सज्ज

Latest Marathi News Live Update : गोकुळचा निकाल आता फेरमतमोजणीच्या फेऱ्यात, जल्लोषानंतर आकडे बदलले; लेटेस्ट अपडेट वाचा

SCROLL FOR NEXT