धुळे : टुडे पान २ साठी..
--
फोटो क्रमांक : 33444
धुळे : जिल्हास्तरीय पाणी गुणवत्ता तपासणी प्रयोगशाळेला शैक्षणिक भेट प्रसंगी सेंट ॲना इंग्रजी माध्यम शाळेतील विद्यार्थिनी. शेजारी प्रयोगशाळेचे अधिकारी व शिक्षक.
--
विद्यार्थिनींनी अनुभवली पाणी तपासणीची प्रक्रिया
--
जिल्हास्तरीय प्रयोगशाळेत सेंट ॲना शाळेची शैक्षणिक भेट
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. २४ : सेवा संकल्प अभियानाअंतर्गत जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष, जिल्हा परिषद धुळे यांच्या वतीने पाणी गुणवत्ता जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमांतर्गत येथील सेंट ॲना इंग्रजी माध्यम शाळेतील नववीच्या विद्यार्थिनींसाठी जिल्हास्तरीय प्रयोगशाळेत शैक्षणिक भेटीचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थिनींना पिण्याच्या पाण्याचे शुद्धीकरण आणि गुणवत्तेबाबत माहिती मिळाली.
-
भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा यांच्या अधिनस्त असलेल्या या प्रयोगशाळेत जिल्हा पाणी गुणवत्ता तज्ज्ञ विजय हेलिंगराव यांनी पिण्याच्या पाण्याचे महत्त्व, नियोजन आणि पाण्याचा वापर करण्याबाबत मार्गदर्शन केले. नंतर प्रयोगशाळेतील रसायनज्ञ गौतम वाघोडे आणि अणुजीवशास्त्र तज्ज्ञ शितल शिंदे यांनी पिण्याच्या पाण्यातील रासायनिक व जैविक घटकांची माहिती दिली. पाण्यात प्रमाणापेक्षा जास्त रासायनिक घटक असल्यास मानवी शरीरावर होणारे दुष्परिणाम, उद्भवणारे आजार आणि त्यावरील उपाययोजनांवर त्यांनी माहिती दिली. तसेच, पाण्यातील अणुजीविक घटकांमुळे होणारे आजार व साथरोगांविषयी माहिती देण्यात आली.
-
या प्रसंगी रासायनिक व अणुजीविक तपासणीसाठी वापरण्यात येणारी उपकरणे दाखवून प्रत्यक्ष चाचणीचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. प्रयोगशाळा सहाय्यक अक्षय निळे यांनी या प्रात्यक्षिकांसाठी सहकार्य केले. यानंतर जिल्हा कक्षातील माहिती, शिक्षण व संवाद सल्लागार अरुण महाजन यांनी पाणी शुद्धीकरण, प्रचार- प्रसिद्धी आणि राज्य धोरणाविषयी माहिती दिली. या भेटीमुळे विद्यार्थिनींनी समाधान व्यक्त केले. विद्यार्थिनींची प्रयोगशाळेत ने- आण करण्याची जबाबदारी क्रीडा शिक्षक गोमाजी थोरात व वाहनचालक मयूर सोनवणे यांनी पार पाडली. उपक्रमासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बाबासाहेब बेलदार, पाणी व स्वच्छता विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी निशा जाधव यांच्या मार्गदर्शनात मनुष्यबळ विकास सल्लागार दीपक देसले व सनियंत्रण व मूल्यमापन सल्लागार वैभव सयाजी यांनी सहकार्य केले.