nashik police esakal
नाशिक

पोलीस, अग्निशमनसाठी एकच क्रमांक 112; नाशिकमध्ये पोलीसांचे 'असे' नियोजन

सकाळ डिजिटल टीम

नाशिक : राज्यात सध्या विविध फोन नंबर विविध सेवांसाठी वापरले जातात. महाराष्ट्रात सुध्दा १०० हा फोन नंबर बदलण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती स्थानिक पोलिस अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे. यासाठी एक राज्यस्तरीय समितीही स्थापन करण्यात आली असून यासाठी पोलिसांचे प्रशिक्षण सुरू आहे. जुलै महिन्यात हा नवीन नंबर राज्यभरात लागू करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ११२ हा क्रमांक डायल करुन पोलीस, अग्निशमन अशा तातडीच्या सेवा एकाच ठिकाणी लवकरच उपलब्ध होणार आहेत. जुलै महिन्याच्या प्रारंभीपासून ११२ या एकाच टोल-फ्री हेल्पलाइनवरुन सर्व प्रकारची मदत मिळणार आहे. हा क्रमांक डायल केल्यानंतर अवघ्या १० मिनिटांत पोलीस घटनास्थळी पोहोचतील, असे नियोजन केले जात आहे. त्यासाठी ग्रामीण पोलिसांना ६ वाहने देण्यात आले असून, पोलिसांचे प्रशिक्षण सुरू आहे. (dial-112-for- police-helpline-training-in-Nashik-marathi-news)

पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांची माहिती

जिल्ह्यात ४० पोलीस ठाणे, २१८ पोलीस अधिकारी व ३ हजार ४०० पोलीस कर्मचारी आहेत. आपत्कालीन परिस्थितीमध्ये तत्काळ मदत हवी असल्यास संकटात सापडलेल्या व्यक्तीने ११२ क्रमांकावर कॉल केल्यास या कॉलची माहिती त्या भागातील पोलीस स्टेशनला समजेल. त्यानंतर प्रसंगानुसार पोलीस नियंत्रण कक्ष, अग्निशमन दल, महिला हेल्पलाईन, चाईल्ड हेल्पलाईन यांनाही एकाचवेळी कॉलची माहिती दिली जाईल व संबंधित यंत्रणा घटनास्थळी दाखल होईल. जुलै महिन्याच्या प्रारंभीपासून ११२ या एकाच टोल-फ्री हेल्पलाइनवरुन सर्व प्रकारची मदत मिळणार आहे. हा क्रमांक डायल केल्यानंतर अवघ्या १० मिनिटांत पोलीस घटनास्थळी पोहोचतील, असे नियोजन केले जात आहे. त्यासाठी ग्रामीण पोलिसांना ६ वाहने देण्यात आले असून, पोलिसांचे प्रशिक्षण सुरू आहे. जुलै महिन्याच्या प्रारंभीपासून ११२ या एकाच टोल-फ्री हेल्पलाइनवरुन सर्व प्रकारची मदत मिळणार आहे. हा क्रमांक डायल केल्यानंतर अवघ्या १० मिनिटांत पोलीस घटनास्थळी पोहोचतील, असे नियोजन केले जात आहे. त्यासाठी ग्रामीण पोलिसांना ६ वाहने देण्यात आले असून, पोलिसांचे प्रशिक्षण सुरू आहे.

पहिल्या टप्प्यात १२० कर्मचार्‍यांना प्रशिक्षण

आपत्कालीन मदतीसाठी शासनाकडून ११२ हेल्पलाईन क्रमांक निश्चित करण्यात आला असून पहिल्या टप्प्यात १२० कर्मचार्‍यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. प्रत्येक पोलीस ठाणेनिहाय १० अशा ५२५ पोलिसांना प्रशिक्षण दिले जाईल. ११२ क्रमांकाची चाचणी घेण्यात तांत्रिक अडचणी येत असून, जुलै महिन्यात ही सेवा सुरू होईल. - सचिन पाटील, पोलीस अधीक्षक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Municipal Corporation protest : महापालिका कर्मचाऱ्यांचे आंदोलन चिघळले; महापौरांची गाडी पेटवण्याचा प्रयत्न, एक कर्मचारी जखमी

Pune Railway: पुणेकर रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी! १९ सप्टेंबरपासून १५ दिवस रेल्वेचा मेगा ब्लॉक; ४२ गाड्या रद्द, २५ गाड्यांचे मार्ग बदलले

जरांगेंची प्रकृती खालावली, वजन ७ किलोंनी घटलं तर शुगरही कमी झाली; मंत्र्यांच्या आश्वासनानंतर घेतले उपचार

Marathi News Live Updates : जरांगेंचा अल्टिमेटम, मुंबईत हालचालींना वेग; मध्यरात्री मुख्यमंत्र्यांनी घेतली बैठक

Mumbai Goa Highway: उड्डाणपूल रखडला, कोंडी कायम; चिपळूणमधील सेवारस्त्यांवर गणेशोत्सवात वाहतुकीचा ताण

SCROLL FOR NEXT