नाशिक

५७व्या जिल्हा साहित्यिक संमेलनाचे उद्घाटन

CD
कला व्यवस्थेला प्रश्न विचारणारी असावी राजू बाविस्कर : ५७ व्या जिल्हा साहित्यिक संमेलनाचे उद्‍घाटन सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. १७ : गावात ज्या घरांच्या पायथ्याशी बसून आईबरोबर भाकरी मागायला बसायचो, त्या पायरीवर बसून घर पाहण्याची उत्सुकता असायची. कालांतराने चित्रकलेने ज्या घरांच्या पायथ्याशी बसलो त्याच घरात लग्नानिमित्त चित्रे रेखाटली. जात, धर्म, पंथाच्या पलीकडे जाऊन घराचा उंबरा ओलांडण्याचे भाग्य चित्रांमुळे लाभले. त्यामुळे कला कोणतीही असो, ती व्यवस्थेला प्रश्न विचारणारी असावी, असे प्रतिपादन साहित्य अकादमी पुरस्कार विजेते लेखक राजू बाविस्कर यांनी केले. सार्वजनिक वाचनालयाच्या ५७ व्या जिल्हास्तरीय साहित्य संमेलनाच्या उद्‍घाटनप्रसंगी ते बोलत होते. मु. शं. औरंगाबादकर सभागृहात शनिवारी (ता. १७) हा कार्यक्रम झाला. महापौर हिमगौरी आडके, ‘सावाना’चे अध्यक्ष प्रा. दिलीप फडके, संमेलनाध्यक्ष प्रकाश होळकर, कवी संमेलनाध्यक्ष राजू देसले, साहित्य व संस्कृती मंडळाचे सदस्य डॉ. राजेश गायकवाड, सांस्कृतिक सचिव जयप्रकाश जातेगावकर, कार्याध्यक्ष संजय करंजकर, प्रमुख सचिव गिरीश नातू आदी उपस्थित होते. बाविस्कर म्हणाले, की जहांगीर आर्ट गॅलरी, भोपाळ तसेच दिल्लीसारख्या ठिकाणी माझ्या चित्रांची प्रदर्शने झाली. पण आलमगीरच्या टपरीवर चित्र लावावे, यासाठी बरीच चित्रे रेखाटली. त्यानंतर माझी चित्रे त्याच्या टपरीवर लागली. राम मंदिरात राहण्यासाठी मिळालेला आसरा या गोष्टी आजही स्मरणात आहेत, तर शिव्या देणारे, कमी लेखणारी लोक आज आठवतही नाहीत. त्यामुळे चांगल्या लोकांची बेरीज करता यायला हवी. मला अनेक चांगल्या लोकांनी घडविल्याने हातात रद्दी न येता चांगली पुस्तके आल्याने लिहिता आले. महापौर हिमगौरी आडके यांनी ‘सावाना’ सांस्कृतिक वारसा पुढे नेण्याचे काम करीत असल्याने त्याच्या विकासासाठी सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही देत नाशिकमध्ये पहिले इंडियन क्रिएटिव्ह इन्स्टिट्यूट सेंटर स्थापन होणार असल्याची माहिती दिली. डॉ. धर्माजी बोडके यांनी परिचय करून दिला. उपाध्यक्ष प्रा. डॉ. सुनील कुटे यांनी प्रास्ताविक केले. ग्रंथसचिव देवदत्त जोशी यांनी सूत्रसंचालन केले. गीता बागूल यांनी आभार मानले. तत्पूर्वी महापौर हिमगौरी आडके, लेखक राजू बाविस्कर यांच्या हस्ते ग्रंथ प्रदर्शनाचे उद्‍घाटन झाले. कविसंमेलनात शंभर कवींचा सहभाग ज्येष्ठ कवी राजू देसले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कविसंमेलनात ‘तू म्हणालीस तर भरदुपारी तुझ्या चंद्र आणून बांधीन दारी तुझ्या...’ ‘ऊन-पाऊस, थंडी वारा; सर्व सोसले नव्या दमाने उभा राहिलो; हरलो नाही...’ यांसारख्या कविता सादर करण्यात आल्या. संमेलनात शंभर कवींनी सहभाग नोंदविला, तर प्रत्येक कवीला सहभागाचे प्रमाणपत्र देण्यात आले. संजय आहेर व जयश्री वाघ यांनी सूत्रसंचालन केले. ‘ग्रंथदिंडी’तून वाचन संस्कृतीचा जागर! जिल्हा साहित्यिक संमेलनाची सुरवात शनिवारी सकाळी कविवर्य कुसुमाग्रज यांच्या निवासस्थानापासून ते ‘सावाना’ परिसरापर्यंत ग्रंथदिंडीने झाली. दिंडीत शहरातील विविध शाळांमधील ३०० विद्यार्थी, ५० शिक्षक, साहित्यप्रेमी आणि वाचनालयाचे पदाधिकारी सहभागी झाले होते. दिंडीत विद्यार्थ्यांनी केलेल्या साहित्यिकांच्या वेशभूषा, सुविचारांचे फलक, लेझीमचा निनाद आणि कवितांच्या सादरीकरणामुळे वाचन संस्कृतीचा जागर घडविणाऱ्या ग्रंथदिंडीने नाशिककरांचे लक्ष वेधून घेतले. वाचनालयाचे व्यवस्थापक दिलीप अहिरे यांनी संयोजन केले. संमेलनात आज रविवारी (ता. १८) सुरुवातीला पदक प्रदान समारंभ होईल. माजी अध्यक्ष डॉ. बी. जी. शेखर नूतन अध्यक्ष प्रकाश होळकर यांच्याकडे अध्यक्षपदाची सूत्रे सुपूर्द करतील. त्यानंतर होळकर ‘समकालीन साहित्य’ याविषयावर विचार मांडणार असून, परिसंवाद, पुरस्कार वितरण तसेच पुरस्कारप्राप्त साहित्यिकाचा सत्कार समारंभ व पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम होईल. NSK26H32870 मु. शं. औरंगाबादकर सभागृह : बोलताना राजू बाविस्कर. NSK26H32869 मु. शं. औरंगाबादकर सभागृह : सावाना आयोजित ५७ व्या जिल्हा साहित्यिक संमेलनाप्रसंगी उपस्थित नागरिक. NSK26H32868 मु. शं. औरंगाबादकर सभागृह : सावाना आयोजित ५७ व्या जिल्हा साहित्यिक संमेलनाचे उद्‍घाटन करताना राजू बाविस्कर, महापौर हिमगौरी आडके, प्रकाश होळकर, राजू देसले, दिलीप फडके, डॉ. राजेश गायकवाड व पदाधिकारी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolkata Stamped: कोलकात्यात दुर्गापूजा मंडपात चेंगराचेंगरी; १७ भाविकांचा मृत्यू

IND vs WI 5th T20I: भारत-वेस्ट इंडिज पाचव्या सामन्याचा निकाल लागला... ९-९ षटकांचा सामना नेमका कुणी जिंकला?

Resort Fire Tragedy : पर्यटकांच्या रिसॉर्टला भीषण आग; एकाच कुटुंबातील ५ जणांसह १० पर्यटकांचा होरपळून मृत्यू, ९ गंभीर!

Couple Found Dead: पत्नीच्या वाढदिवशीच 'त्या' दोघांनी संपविले जीवन; 'आम्ही जग सोडतोय...!' कोणाला पाठवला ईमेल?

IND vs WI 5th T20I: इशान किशनचे वादळ, मोडला विक्रम; भारताने ९ षटकांच्या मॅचमध्ये किती धावा केल्या? पावसाने पुन्हा घोळ घातला

SCROLL FOR NEXT