Malaria Disease esakal
नाशिक

Malaria Disease : मलेरिया विभाग पुन्हा वैद्यकीय विभागात वर्ग

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : वादग्रस्त कारभाराने गाजलेला महापालिकेचा मलेरिया विभाग पुन्हा वैद्यकीय विभागात वर्ग केला आहे. या विभागाचे प्रमुख राजेंद्र त्र्यंबके यांनी प्रस्तावात खाडाखोड करत वर्षभरासाठी अळीनाशक औषध खरेदी करण्यास मंजुरी दिल्याने या विभागाचे स्वतंत्र अस्तित्वच संपुष्टात आणले आहे.

महापालिकेचे माजी आयुक्त तुकाराम मुंडे यांनी वैद्यकीय व आरोग्य विभाग तीन भागात विभाजित केला. वैद्यकीय विभागाकडे महापालिकेचे रुग्णालय तर आरोग्य विभागाकडे शहर स्वच्छता घंटागाडी तसेच अमरधाम विभागाची जबाबदारी देण्यात आली. तर शहरात औषध फवारणी करण्यासाठी मलेरिया विभाग स्वतंत्र करण्यात आला.

या विभागाचा कार्यभार मलेरिया विभागाचे प्रमुख डॉ. राजेंद्र त्र्यंबके यांच्याकडे आहे. त्र्यंबके यांच्या कार्यकाळामध्ये पेस्ट कंट्रोलचा ठेका वादग्रस्त झाला. मागील टर्ममध्ये 18 कोटींचा ठेका तब्बल 46 कोटींवर पोचल्याने येथून या विभागाच्या कामकाजावर संशय व्यक्त करण्यात आला.

तब्बल दोन ते अडीच वर्षांपासून ठेकेदाराला सहा- सहा महिन्याची मुदतवाढ दिली जात असल्याने ठेकेदाराच्या भल्यासाठी काम करत असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पेस्ट कंट्रोलच्या ठेकेदारांना कार्यारंभ आदेश देण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असतानाच स्थायी समितीच्या बैठकीत एक वर्षासाठी विनानिविदा 77 लाख रुपयांची अळीनाशक औषधे खरेदीचे कंत्राट दिले गेले.

तीन महिन्यासाठी औषध खरेदीला मंजुरी महापालिका आयुक्तांनी दिली होती. मात्र प्रस्तावात खाडाखोड करत वर्षभराचा उल्लेख करण्यात आला. त्यामुळे मलेरिया विभागप्रमुख त्र्यंबके यांच्या आधिपत्याखालील असलेला हा विभाग पुन्हा वैद्यकीय विभागाकडे वर्ग करण्यात आला आहे.

दरम्यान, तीन महिन्याच्या अळीनाशक औषधे खरेदी करण्याचा प्रस्तावात वर्षभराचा उल्लेख असल्याने त्यावरून आयुक्तांनी कानउघाडणी केली. त्यानंतर प्रिंटिंग मिस्टेक असल्याचा दावा डॉ. त्र्यंबके यांनी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Scorpio कारमध्ये माजी सरपंचासह 4 जणांना जिवंत जाळलं; दुमडलेली सीट, रक्तानं माखलेली आगपेटी अन् विटांवर रक्ताचे डाग.., घातपाताचा संशय बळावला!

Pune News : पुणे शहरात सिमेंट काँक्रिट उखडले; रस्त्यावर पुन्हा खड्डे

Pali Census : 40 ते 42 अंश सेल्सिअस तापमानात 'सुपरहिरो' बनून फिरतायत शिक्षक; उन्हाच्या लाहीलाहीतही जनगणनेचे राष्ट्रीय कर्तव्य अविरत सुरू

Nashik POCSO Case : नाशिकमध्ये गुरु-शिष्याच्या नात्याला काळिमा; 15 वर्षांच्या विद्यार्थिनीचे फोटो काढून शिक्षकाने केले ब्लॅकमेल, मनसूरचे धक्कादायक कृत्य

Amit Shah: ''शक्य तेवढ्या लवकर आपल्या देशात निघून जा'', अमित शाहांचा इशारा; 'ती' जमीन बीएसएफकडे सुपूर्द

SCROLL FOR NEXT