टूडे साठी
---------
कंत्राटी कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी बोनस
आयुक्तांचे आदेश; ठेकेदारांनाच बोनस द्यावा लागणार
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. १५ : महापालिकेच्या विविध विभागांमध्ये कार्यरत असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना दिवाळी सणानिमित्त किमान एक महिन्याच्या वेतनाइतके सानुग्रह अनुदान देण्याबाबत प्रशासनाने कार्यवाही सुरू केली आहे. आयुक्त मनिषा खत्री यांनी सर्व खातेप्रमुखांना संबंधित ठेकेदारांना दिवाळीपूर्वी बोनस अदा करण्याच्या सूचना देण्याचे निर्देश दिले आहेत.
उपमहापौर विलास शिंदे, शिवसेना गटनेते अजय बोरस्ते, नगरसेवक प्रवीण तिदमे यांनी याबाबत पत्राद्वारे मागणी केली होती. त्या पत्राच्या अनुषंगाने आयुक्तांनी १४ ऑक्टोबरला लेखी आदेश काढले आहेत. महापालिकेत सफाई कामगार, वॉचमन, वाहनचालक, पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य, उद्यान, विद्युत आणि इतर अत्यावश्यक सेवांमध्ये अनेक कंत्राटी कर्मचारी सेवा बजावत आहेत. त्यांना बोनस देण्यासाठी सकारात्मक पुढाकार घेणे, आर्थिक तरतूद तपासणे आणि कंत्राटी अटींचा अभ्यास करण्याची मागणी लोकप्रतिनिधींनी केली होती. यावर आयुक्तांनी स्पष्ट केले आहे की, महापालिका कंत्राटी स्वरूपात काम घेत असताना किमान वेतन कायद्यानुसार कंत्राटी कामगारांना किमान वेतन देणे बंधनकारक आहे. संबंधित मक्तेदारांकडून त्यांच्या अधिनस्त कर्मचाऱ्यांना किमान वेतनाच्या नियमानुसार ८.३३ टक्के बोनस दिला जातो. महापालिकेकडून मक्तेदाराला दिल्या जाणाऱ्या वेतनाच्या रकमेतच बोनसचा समावेश असल्याने मक्तेदारानेच कामगारांना बोनस देणे क्रमप्राप्त आहे. महापालिकेने पुन्हा बोनस दिल्यास दुबार अदायगी होईल. त्यामुळे कोणतीही दुबार अदायगी न करता, नियमानुसार मक्तेदारांमार्फतच संबंधित कंत्राटी कर्मचाऱ्यांना वेळेत बोनस दिला जावा, अशा सूचना सर्व खातेप्रमुखांना देण्यात आल्या आहेत.
-------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.