Shopping of Akash Kandil esakal
नाशिक

Diwali Festival 2022 : पर्यावरण पूरक आकाश कंदीलाची विदेश वारी!

सकाळ वृत्तसेवा

जुने नाशिक : दिवाळीनिमित्त रंगबिरंगी आकाशकंदीलने संपूर्ण बाजारपेठ झगमगली आहे. विविध प्रकारच्या आकाशकंदीलमध्ये यंदा पर्यावरणपूरक आकाशकंदीलाची क्रेझ नागरिकांमध्ये दिसून येत आहे. इतर वर्षाच्या तुलनेत यंदा त्यांची मागणी वाढली आहे. त्यातील श्रीमंतयोगी आकाशकंदीलाची विदेश स्वारी झाली आहे. (Diwali Festival 2022 Environmentally friendly sky lanterns demand in abroad nashik Latest Marathi News)

दिवाळीत घरासमोर आकाशकंदील लावण्याची परंपरा वर्षानुवर्षं चालत आलेली आहे. त्यानिमित्त बाजारात विविध रंगी आकाराचे आकाशकंदील विक्री होताना दिसत आहे. नेहमी विक्री होणाऱ्या आकाशकंदीलामध्ये यंदा पर्यावरणपूरक आकाशकंदीलाची मागणी वाढली आहे. इतर आकाशकंदीलच्या तुलनेत सुमारे ६० ते ६५ टक्क्यांनी पर्यावरणपूरक आकाशकंदीलाला मागणी आहे.

प्रत्येक क्षेत्रात पर्यावरणपूरक गोष्टीचा वापर करण्यासाठी सामाजिक संस्था, पर्यावरण संस्था, सरकारतर्फे विविध माध्यमातून जनजागृती करत आहे. त्यामुळे पर्यावरणपूरक आकाशकंदीलची मागणी वाढण्यास मदत झाल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली. कच्च्या मालाच्या किमती ३० टक्के वाढल्याने आकाशकंदीलाच्या किमतींत सुमारे ४० टक्क्यांची वाढ झाली आहे. .

मागणी वाढल्याने उत्पादनात वाढ

यंदा परिस्थिती सामान्य असल्याने सर्वत्र उत्साहात सण साजरे होत आहे. आकाशकंदील तयार करण्याच्या उत्पादनात सुमारे ४० ते ५० टक्के वाढ झाली आहे. होलसेल विक्रेत्यांपेक्षा घाऊक (किरकोळ) विक्रेत्यांकडे आकाशकंदीलाची मागणी वाढली आहे. विविध रंगी, आकार, प्रकाराचे आकाशकंदील बाजारात विक्री होत आहे.

२० रुपयांपासून तर १० हजार रुपयांपर्यंत आकाशकंदील विक्रीस आहे. वाढती महागाई आणि पावसाचा परिणाम यामुळे पाचशे रुपयांच्या आत किमतीचे आकाशकंदील खरेदीकडे नागरिकांचा अधिक कल असल्याचेही विक्रेत्यांनी सांगितले. पारंपारिक आणि इको- फ्रेंडली आकाशकंदीलाकडे नागरिकांचा कल आहे.

पारंपरिक कंदीलासाठी बांबूच्या कांबट्या, कापडासह विविध रंगी आणि आकाराचे आकाशकंदील तयार करण्यासाठी कागदी पुट्टा, लाकूड, बारदान, वेलवेट, फर कापड, लोकर, ट्रेसिंग पेपर, तार, कार्डशीट, विविधरंगी कागद, प्लायवूड पुठ्यापासून तयार केलेले लाकूड आणि कापडाचे, कागदापासून तयार केलेले झोपडी कंदील, तोरण कंदील, करंजी कंदील, हंडी कंदील, झुंबर कंदील, पारंपारिक षटकोनी कंदील, चौकोन आकारातील आदी पर्यावरणपूरक आकाशकंदील विक्रीसाठी उपलब्ध आहेत

श्रीमंत योगी आकाशकंदीलाची विदेशवारी

या वर्षी श्रीमंतयोगी, राजे, दीपावली पणती, शंभुराजे, विठ्ठल पर्यावरणपूरक आकाशकंदील विक्रीस आले आहे. त्यातील श्रीमंतयोगी आकाशकंदीलाची विदेशवारी झाली आहे. दुबई येथे वास्तव्यास असणाऱ्या बांधवांकडून श्रीमंतयोगी आकाशकंदीलाची मोठी मागणी झाली आहे. सुमारे ६० ते ७० श्रीमंतयोगी आकाशकंदील दुबई येथे रवाना झाले आहे.

"यंदा मागणी चांगली आहे. नागरिकांचा आर्थिक विचार करून आकाशकंदील तयार करण्यात आले आहे. पावसाचा परिणाम विक्रीवर झाला आहे."

- संपत परदेशी, विक्रेता

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flood: नेपाळच्या मदतीला भारत धावला! महापुरामुळे वीज संकट; मागणीनुसार अतिरिक्त वीजपुरवठा करणार

Asia Cup 2026: बलाढ्य टीम इंडिया शफालीच्या फिफ्टीनंतरही थायलंडसमोर ढासळली; किती धावांचे ठेवले टार्गेट?

Abhijeet Dipke: विजेता दहिया यांची CJPमध्ये एन्ट्री होणार? अभिजीत दिपकेंनी दिलं मोठं उत्तर; स्पष्ट केली भूमिका

Manoj Jarange : मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला अभिजीत दिपकेंचा पाठिंबा; सरकारला दिला थेट इशारा

ENG vs PAK: जो रुटचा पाकिस्तानविरुद्ध लॉर्ड्सवर खेळताना विश्वविक्रम! सचिन तेंडुलकर, पाँटिंगलाही टाकलंय मागे

SCROLL FOR NEXT