dr ms gosawi death secretary of gokhale education society of nashik dr ms gosawi passes away  
नाशिक

Dr M S Gosawi Death : शिक्षणतज्ज्ञ डॉ. मो. स. गोसावी यांचे निधन; शरद पवारांनी घेतलं अंत्यदर्शन

रोहित कणसे

नाशिक : गोखले एज्युकेशन सोसायटीचे सचिव डॉ. मो. स. गोसावी (वय 88) यांचे रात्री पावणेदोनला निधन झाले. आज रविवारी सायंकाळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. त्यांच्या मागे मुले शैलेश आणि कल्पेश आणि कन्या डॉ. दीप्ती देशपांडे असा परिवार आहे.

कमी वयात महाविद्यालय प्राचार्य म्हणून गोसावी यांची निवड झाली होती. याबद्दल कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांनी केलेले कौतुक ते आवर्जून सांगत. श्रीमद्भगवद्गीतेचे ते अभ्यासक होते. गीता, ज्ञानेश्वरी याविषयक पुस्तके त्यांनी लिहली आहेत.

काही वेळापूर्वी राष्ट्रवादीचे काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, मंत्री छगन भुजबळ यांनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले.

सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी बीवायके महाविद्यालयात ठेवले जाणार आहे. तर सायंकाळी साडे पाचला नाशिक येथील अमरधाम येथे पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT