Jayashree Barve  esakal
नाशिक

चालक दिन विशेष : लेकींना हवाई सुंदरी बनविण्यासाठी रिक्षाचालक आईची पराकाष्ठा

योगेश मोरे

‘मंजिले उन्ही को मिलती है,
जिनके सपनो मे जान होती है!
युही पंख होने से कुछ भी नही होता,
हौसले से उडान होती है.

पंचवटी (जि. नाशिक) : तुमच्यातील जिद्द, इच्छाशक्ती आणि तुमच्यातला हौसला तुमची स्वप्ने पूर्ण करू शकतो, असे कोण्या शायरने म्हटले आहे. तीच जिद्द, हौसला उराशी बाळगत एका रिक्षाचालक महिलेने मोठे स्वप्न पाहिले आहे. केवळ स्वप्न पहिलेच नाही, तर या स्वप्नपूर्तीसाठी तिने स्वतःला झोकून दिले आहे.

बऱ्याचदा आयुष्यात आपल्याला काही करता आले नाही, काही बनता आले नाही, याची खंत सतावत असते. परंतु, आपल्याला जे करता आले नाही वा परिस्थितीमुळे आपण करू शकलो नाही, ते स्वप्न अनेकजण आपल्या मुलांमध्ये बघत असतात. असेच एक स्वप्न नाशिकमधील एका शेतकरी कुटुंबातील महिलेने पाहिले आहे.

व्यवसायाने रिक्षाचालक असलेल्या या मातेने आपल्या लेकींना चक्क हवाई सुंदरी बनविण्याचे स्वप्न पाहिले आहे. शेतकरी कुटुंबातील असलेल्या ३३वर्षीय जयश्री सुरेश बर्वे असे या मातेचे नाव असून, शहरापासून जवळच असलेल्या माडसांगवी येथील त्या रहिवासी आहेत. पती, एक मुलगा, दोन मुलीसह सासू, सासरे असे त्यांचे कुटुंब. (Drivers Day Special women rickshaw driver jayashree brave effort to make daughter air hostess Nashik Latest Marathi News)

वडिलोपार्जित शेती असल्याने शेती हाच या कुटुंबाचा मुख्य व्यवसाय आणि रोजगाराचे साधन. परंतु, तुटपुंज्या शेतीत भागत नसल्याने त्यांचे पती सुरेश हे रुग्णवाहिका व रिक्षाही चालवितात. कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडून जयश्री या पतीला शेतीत हातभार लावतात. वेळप्रसंगी त्या ट्रॅक्टरही चालवत. सर्व काही सुरळीत चाललेले असताना अचानक कोरोनाचे जागतिक संकट समोर आले.

या वैश्विक संकटाचा फटका बर्वे कुटुंबीयांनाही बसला. लॉकडाउनमुळे शेतीतही अपयश आले. थोडेफार कर्जही झाले. पुढे कर्ज वाढले तर मुलांच्या शिक्षणासाठी पाहिलेले स्वप्न धुळीस मिळू नये, ही भीती जयश्री यांना सतावत होती. अशावेळी कुटुंबाला हातभार लावावा, मुलांच्या शिक्षणालाही अडचण येऊ नये, यासाठी पतीची रिक्षा चालविण्याचा घरातील सर्वांना आश्चर्यकारक करणारा निर्णय जयश्री यांनी घेतला.

ट्रॅक्टर चालविणाऱ्या जयश्री यांनी रिक्षा चालवायला सुरवात केली आणि कुटुंबाला हातभार लावू लागल्या. यातून जयश्री यांनी कुटुंबावर झालेले कर्ज कमी करण्यासाठी पतीला मदत केली. अशाही परिस्थितीत स्वतः रिक्षा चालविणाऱ्या जयश्री यांनी आपल्या दोन्ही लेकींना हवाई सुंदरी बनविण्याचे स्वप्न उराशी बाळगले आहे. विशेष म्हणजे, हे स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी या मातेने स्वतःला कामामध्ये अक्षरशः झोकून दिले आहे. या मातेच्या स्वप्नपूर्तीसाठी चालक दिनानिमित्त शुभेच्छा...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commonwealth Games 2026 : आजोबा भाजी विकायचे, वडील शिवणकाम करतात... लव्हप्रीतने भारतासाठी जिंकले ऐतिहासिक पदक!

Commonwealth Games 2026 : घोर निराशा... तजिंदरपाल सिंग तूर पदक जिंकण्यापासून वंचित, समरदीप सिंगलाही अपयश; नेमकं कुठे चुकले?

Anti paper leak bill: विरोधकांचा सभात्याग अन् 'पेपरफुटी'विरोधी विधेयक राज्यसभेत मंजूर; अंतिम मंजुरीसाठी राष्ट्रपतींकडे पाठवले जाणार

Phule Wada Memorial Delay: फुले वाडा व सावित्रीबाई फुले स्मारकाचे काम संथ; छगन भुजबळ यांची पुणे महापालिकेवर कडक टीका

Pune Police Misconduct: तपासाऐवजी पर्यटन; विश्रामबागेतील तीन पोलिसांवर कारवाई, दोन वर्षे वेतनवाढ रोखली

SCROLL FOR NEXT