नाशिक

पशुधनाची चिंता कायम

CD
धुळे : टुडे पान १ साठी..मेन -- दुष्काळाचे संकट, पशुधनाची चिंता कायम -- जिल्ह्यात ११ लाख ८१ हजार पशुधन; चार लाख मेट्रिक टन चारा उपलब्ध धनंजय सोनवणे : सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. २५ : जिल्ह्यातील चारही तालुक्यांत दुष्काळ जाहीर झाल्यामुळे पशुधनासाठी चाऱ्याची उपलब्धता कायम ठेवण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर निर्माण झाले आहे. जिल्ह्यात ११ लाख ८१ हजार ५६ पशुधन असून, सध्या चार लाख आठ हजार ५३३ मेट्रिक टन चारा उपलब्ध आहे. भविष्यातील टंचाई टाळण्यासाठी पशुसंवर्धन विभागाकडून चारा उत्पादन, बियाणे वाटप, कुरण विकास आणि पशुआरोग्यविषयक विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. याशिवाय वन विभागाच्या जमिनीवर देखील चारा लागवड हाती घेण्यात आली आहे. ------- जिल्ह्यात यंदा भीषण दुष्काळाची दाहकता जाणवत आहे. यंदा अत्यल्प पावसामुळे जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती ओढवली आहे. जिल्ह्यातील चारही तालुक्यात शासनाकडून दुष्काळ जाहीर झाला आहे. अशातच ऑक्टोबर महिन्यातच तापमानाचा पारा ३५ अंशाच्या पुढे कायम असून आगामी काळात यात वाढ होण्याचा अंदाज तज्ञांकडून वर्तवला जात आहे. या स्थितीत पिण्याच्या पाण्यासोबतच पशुधनाच्या चाऱ्याचा देखील प्रश्न उद्भवणार आहे. अशातच हिरव्या चाऱ्याचे उत्पादन वाढविण्यासाठी विविध महत्त्वाच्या योजनांची अंमलबजावणी जिल्ह्यात केली जात आहे. - चारा उत्पादन वाढविण्यासाठी जिल्हा नियोजन समिती (डीपीसी) आणि दुग्ध विकास प्रकल्पाच्या माध्यमातून बियाणे वाटप करण्यात आले आहे. जिल्हा नियोजन समितीने यासाठी विशेष निधी खर्च केला आहे. अशातच नुकत्याच झालेल्या बैठकीत जिल्ह्यातील वन क्षेत्रात चारा लागवड करण्याच्या सूचना महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिल्या होत्या. तसेच, जिल्ह्याचा चारा जिल्ह्यासाठीच ठेवण्याचे देखील नियोजन करण्यात आले होते. उपलब्ध चाऱ्याचा काटकसरीने वापर, हिरव्या चाऱ्याची लागवड आणि कुरण विकास या उपाययोजनांमुळे दुष्काळाच्या काळात पशुधनाला चारा उपलब्ध करून देण्यास मोठी मदत होणार आहे. - गोठ्यातच हवा चारा दरम्यान, जिल्ह्यात चारा छावणी न उभारता शेतकऱ्यांना थेट गोठ्यातच चारा उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून सातत्याने करण्यात येत आहे. अशातच नुकत्याच झालेल्या बैठकीत महसूलमंत्री बावनकुळे यांनी थेट गावात दावणीवरच चारा उपलब्ध करण्याचे नियोजन करण्याबाबत सूचित केले होते. यासाठी गावपातळीवर नियोजन करण्याच्या महत्त्वाच्या सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. याच्या अंमबाजवणीकडे शेतकऱ्यांचे लक्ष असेल. - १४-१ ..चौकट.. १४-१ १३१ दिवसांचा चारा उपलब्ध जिल्ह्यात ११ लाख ८१ हजार ५६ जनावरे आहेत. यात धुळे तालुक्यात तीन लाख २७ हजार ६७४, साक्री तालुक्यात पाच लाख ६३ हजार तीन, शिरपूर तालुक्यात एक लाख ५२ हजार १७८, तर शिंदखेडा तालुक्यात एक लाख ३८ हजार २०१ इतके पशुधन समाविष्ट आहे. या सर्व जनावरांसाठी जिल्ह्यात चार लाख आठ हजार ५३३ मेट्रिक टन चारा उपलब्ध आहे. तालुकानिहाय विचार करता, धुळे तालुक्यासाठी एक लाख सात हजार ७९३, साक्री तालुक्यासाठी एक लाख ६८ हजार ८५२, शिरपूर तालुक्यासाठी ६३ हजार ३०८ आणि शिंदखेडा तालुक्यासाठी ६८ हजार ५८० मेट्रिक टन चारा उपलब्ध असून, हा चारा सरासरी १३१ दिवस पुरेल एवढा आहे. दुष्काळाच्या काळात या उपलब्ध साठ्याचे योग्य नियोजन व व्यवस्थापन करणे गरजेचे बनले आहे.

Dilip Walse Patil: कर्जतमधील वृक्षतोडीचा भीमाशंकर अभयारण्याशी संबंध नाही; दिलीप वळसे पाटलांचे स्पष्टीकरण

Solapur Crime: मेहुणीला शिक्षणासाठी घरी आणलं, पत्नी असताना तिच्यासोबत लग्न केलं अन्...; सासऱ्याने घडवला रक्तरंजित थरार

VIDEO : मल्लिकार्जुन खरगेंचं वादग्रस्त वक्तव्य; PM मोदींबद्दल बोलताच कार्यक्रमात गोंधळ, काँग्रेस कार्यकर्त्यांकडून एकाला मारहाण, नेमकं काय घडलं?

Madhuri Dixit Kon Honaar Karodpati : "बाई, तुम्ही खूप कडक बोलताय..."; शिक्षिकेसमोर थेट विद्यार्थी बनली माधुरी दीक्षित! 'कोण होणार करोडपती'मधील सुंदर क्षणाचा व्हिडिओ व्हायरल!

Latest Marathi News Update : चौकशीपूर्वीच रुग्णालयातून धूम ठोकून राणा सूर्यवंशी पसार! बारामती हल्ला प्रकरणात खळबळ, पोलिसांकडून शोध सुरू

SCROLL FOR NEXT