dam esakal
नाशिक

दिंडोरी तालुक्यात पाणीसाठ्यात वाढ; संततधारेमुळे शेतकरी सुखावला

रामदास कदम

दिंडोरी (जि. नाशिक) : तालुक्यातील पश्‍चिम पट्ट्यात पाच दिवसांपासून सुरू असलेल्या भीजपावसामुळे करंजवण, वाघाड, पालखेड धरणातील साठ्यात सरासरी पाच टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे शेतकरी सुखावला असून, शेतीकामांना वेग येणार आहे. (Due-to-continuous-rains-water-level-of-dams-in-Dindori-taluka-increased)

सर्वत्र पावसाने शेतकरी चिंतामुक्त

पश्‍चिम पट्ट्यात डोंगराळ भाग असल्याने लवकर जमिनीची भूक भागून पाणी वाहू लागले. त्यामुळे धरणांच्या पातळीत सरासरी ५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. पाच दिवसांपासून सूर्यदर्शन नाही. दिवसभर रिमझिम पाऊस सुरू आहे. दिंडोरी तालुक्यात पाऊस पडला तर इतर तालुक्यांचे गणित जुळते. यामुळे निफाड, येवला, नांदगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. दिंडोरी तालुक्यात जून महिना पूर्ण कोरडाच गेला. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता होती. सध्या सर्वत्र पाऊस पडत असल्याने चिंता दूर झाली आहे.

धरण पूर्वीचा साठा आताचा साठा (टक्क्यात)

  • वाघाड २.६६ २६.१०

  • करंजवण ६.५० १०.३५

  • पालखेड २९.४३ ३६.१८

  • पुणेगाव ६.६८ ७

  • ओझरखेड २५.४३ २५.६४

  • तिसगाव ०.७७ ०.८६

(Due-to-continuous-rains-water-level-of-dams-in-Dindori-taluka-increased)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipeeth Highway: शक्तिपीठ महामार्गाच्या भूसंपादनाला वेग; पुणे विभागातील चार जिल्ह्यांत ६२०० हेक्टर जमीन संपादित होणार

Satish Jarkiholi ED Raid : मंत्री सतीश जारकीहोळींसह कन्या खासदार प्रियांका जारकीहोळी यांच्या घरांवर ईडीची छापेमारी; १८ ठिकाणी धाड

प्रणालीचं नाव घेताच कल्ला, आपल्याला कुणीही विचारत नाही, भडकली जान्हवी किल्लेकर; व्हायरल व्हिडिओवर किरण माने म्हणाले-

Marathi News Live Updates : लातूर जिल्ह्यात कोरडा दुष्काळ; शेतकऱ्यांच्या स्वप्नांची माती, मायबाप सरकारला आर्त हाक

Satara Crime: मंत्री शिवेंद्रसिंहराजेंचा AI मॉर्फ केलेला फोटो पोस्ट केल्याप्रकरणी गुन्हा; तीन फेसबुक अकाउंटधारकांसह यूट्यूब चॅनेलवर कारवाई

SCROLL FOR NEXT