Money Sakal
नाशिक

नाशिक जिल्‍ह्यास अवकाळीची तीन कोटींची मिळाली नुकसानभरपाई

अरूण मलाणी

सर्वाधिक दीड कोटीची मदत बागलाण तालुक्‍यास मिळाली आहे.

नाशिक: गेल्‍या फेब्रुवारीत अवकाळी पाऊस व गारपिटीने झोडपल्‍याने जिल्‍ह्यात शेतीचे नुकसान झाले होते. या संदर्भात सुमारे पाच महिन्‍यांनंतर शासनातर्फे नुकसानभरपाईपोटी जिल्‍ह्याला तीन कोटी दोन लाख ९८ रुपये प्राप्त झाले आहेत. ही मदत शेतकऱ्यांच्या बँक खात्‍यात वर्ग केली जात असून, सर्वाधिक दीड कोटीची मदत बागलाण तालुक्‍यास मिळाली आहे.

वातावरणातील बदलांसह अवकाळीच्‍या संकटाला शेतकऱ्यांना सामोरे जावे लागते आहे. या वर्षी फेब्रुवारीत पूर्ण राज्‍याला अवकाळी पाऊस व गारपिटीने झोडपले होते. नाशिक जिल्‍ह्यातील शेतीचेही नुकसान झाले होते. यात गहू, मका, सोयाबीन, कांदा यासह डाळिंबबागांना फटका बसला होता. जिल्‍ह्यातील आठ तालुक्यांतील १८७ गावांमध्ये नुकसान झाल्‍याचे नोंदविले होते. प्रामुख्याने बागलाण तालुक्‍यातील डाळिंबबागांना अवकाळीचा सर्वांत मोठा फटका बसला होता. त्यावेळी शासनाने जिल्‍हा प्रशासनास पंचनामे करून सविस्‍तर अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. त्‍यानुसार पंचनामे पूर्ण करत शासनाकडे आर्थिक मदतीचा प्रस्‍ताव पाठविला होता. साधारणतः सहा महिन्यांनी शासनाकडून जिल्ह्यासाठी आर्थिक मदत प्राप्त झाली आहे. थेट शेतकऱ्यांच्‍या बँक खात्‍यावर मदतीची रक्‍कम वर्ग केली जात आहे.

दरम्‍यान, बागलाण तालुक्‍यासाठी एक कोटी ५४ लाख ६७ हजार ४५ रुपये, निफाडला ८५ लाख ८९ हजार ७००, दिंडोरीसाठी ४८ लाख ४९ हजार ५००, नाशिक तालुक्‍यासाठी आठ लाख २१ हजार ४३० रुपये नुकसानभरपाई प्राप्त झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

First Solo Trip Tips: पहिल्यांदाच सोलो ट्रिपला जाताय? मग हे ‘गोल्डन रूल्स’ नक्की लक्षात ठेवा!

Marathi News Live Updates : मानसिकदृष्ट्या असमर्थ महिलेवर लैंगिक अत्याचार

SCROLL FOR NEXT