नाशिक

आजपासून दुर्गापूजा महोत्सवाला सुरवात

CD
फोटो : H32568 दुर्गापूजा महोत्सवाला आजपासून सुरवात बंगाली असोसिएशनतर्फे विविध कार्यक्रम सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. १५ : षष्ठी ते दशमीपर्यंत साजरा केला जाणारा दुर्गापूजा महोत्सवाला शुक्रवार (ता. १६) पासून सुरवात होत असून पत्रिकेतील तिथीनुसार षष्ठीला सकाळी देवीची पूजा केली जाते. विजयादशमीपर्यंत दररोज सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रम, देवीला ‘भोग’मध्ये विविध पदार्थ त्याचबरोबर संध्या आरती, ‘धुनुची नृत्य’ संधी पूजा केली जाते. शहरात गेल्या कित्येक वर्षापासून वास्तव्यास असलेल्या बंगाली बांधवाचा दरवर्षी दुर्गापूजा महोत्सव शहराच्या गंगापूर रोड, सिडको, नाशिकरोड, देवळाली, इंदिरानगर, ओझर या विविध भागांमध्ये मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. १६ ते २१ ऑक्टोबरदरम्यान आनंदवली येथील वृंदावन लॉन्स येथे महोत्सव होत असून सलग सहा दिवस सुरू राहणाऱ्या महोत्सवात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी असल्याने नाशिककरांनी या महोत्सवात सहभागी व्हावे तसेच बंगाली संस्कृती जाणून घ्यावी असे आवाहन असोसिएशनचे अध्यक्ष प्रशांत भट्टाचार्य, डॉ. संदीप रॉय, उपाध्यक्ष, शेखर दत्ता, सरचिटणीस अमिताभ भट्टाचार्य, समर बॅनर्जी, गौतम नाग, आशिष शहा, अभिजित चंद्रा यांनी केले आहे. दरम्यान, देवीची मूर्ती बनविण्यासाठी कोलकाता वरून खास कलाकार तीन-चार महिने आधीच नाशिकमध्ये येतात. ही मूर्ती प्लास्टर ऑफ पॅरिस किंवा शाडू मातीपासून बनविली जात नाही तर, मातीपासून तयार केली जाते. त्यामध्ये घास, बांबूचा सांगाडा तयार केला जातो. यामध्ये देवीचे डोळे फार वेगळ्या पद्धतीने काढले जात असल्याने देवीची मूर्ती आकर्षक दिसते. -- चौकट अष्टमीला अधिक महत्त्व दुर्गापूजा महोत्सवात अष्टमीला अधिक महत्त्व असते. महादशमीला सिंदूर महोत्सव, विजया रॅली काढली जाते. सकाळी देवीला भोग चढवून पुष्पांजली (आरती पूजा) केली जाते. पूजा होईपर्यंत उपवास केला जातो. पूजा झाल्यानंतर फराळ केले जाते. विसर्जनाला देवीच्या पायाचे दर्पणामध्ये दर्शन घेतले जाते. त्यानंतर अपराजिता पूजा, देवीच्या घटाचे विसर्जन केले जाते. त्यानंतर सिंदूर महोत्सव साजरा केला जातो. देवीच्या पायाला सिंदूर लावून मिठाई खिलवून निरोप दिला जातो. देवीला विसर्जित केल्यानंतर विजया रॅली काढली जाते. -------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

cctv video: जामनेर तालुक्यात भीषण अपघात! एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू, ट्रक चालक ताब्यात

FDA Blood Donation Rules : रक्तदान शिबिरांबाबत आयुक्त तुकाराम मुंढेंचा मोठा निर्णय!

IND vs NZ: बुमराह नसेल, तर त्याच्या जागी न्यूझीलंडविरुद्ध ODI मालिकेत कोणाची वर्णी लागणार? शमीसह तीन खेळाडूंचे पर्याय

Manoj Jarange On Farmer Relief : "५ हजारांसाठी शेतकऱ्यांनी बँकेच्या रांगेत मरायचं का?"; मनोज जरांगेंचा सरकारवर थेट हल्लाबोल, म्हणाले...

Latest Marathi News Update: कोथरुडमध्ये मद्यधुंद तरुणाची बेदरकारपणे ड्रायव्हिंग

SCROLL FOR NEXT