नाशिक

नाशिक बंगाली असोसिएशनच्या दुर्गापूजा महोत्सवाला मंगलमय प्रारंभ

CD
फोटो : H32719 भक्तिरंगात रंगला दुर्गापूजेचा सोहळा बंगाली असोसिएशनच्या दुर्गापूजा महोत्सवाला प्रारंभ सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. १७ : भक्ती, परंपरा आणि सांस्कृतिक उत्साहाचा त्रिवेणी संगम असलेल्या नाशिक बंगाली असोसिएशनच्या दुर्गापूजा महोत्सवाला शुक्रवारी (ता. १६) मंगलमय वातावरणात प्रारंभ झाला. महाषष्ठीच्या पूजाविधींनी सुरू झालेल्या या महोत्सवामुळे आनंदवल्ली परिसरात उत्सवी रंगत अवतरली आहे. पुष्पांजली, आमंत्रण, अधिवास, संध्या आरती आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी पहिल्या दिवसाची शोभा वाढवली. गंगापूर रस्त्यावरील आनंदवल्ली येथे सेरेन मेडोजसमोरील वृंदावन लॉन्समध्ये हा सहादिवसीय सोहळा रंगत आहे. दुर्गामातेच्या आराधनेसोबतच बंगाली संस्कृती, परंपरा आणि कलावैभवाचा अनुभव नाशिककरांना या महोत्सवातून घेता येणार आहे. शनिवारी (ता. १७) महासप्तमी, रविवारी (ता. १८) महाअष्टमी, सोमवारी (ता. १९) महानवमीशी संबंधित धार्मिक विधी, मंगळवारी (ता. २०) महानवमी, तर बुधवारी (ता. २१) महादशमी साजरी होणार आहे. महाअष्टमीला विशेष पूजेसह संधीपूजेचे आयोजन करण्यात आले आहे. महापूजा, पुष्पांजली आणि संध्या आरतीबरोबरच सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेलही या काळात अनुभवायला मिळेल. महादशमीच्या दिवशी अपराजिता पूजा, सिंदूर उत्सव आणि विजयादशमीच्या पारंपरिक सोहळ्याने महोत्सवाची सांगता होईल. याशिवाय २५ ऑक्टोबरला कोजागरी लक्ष्मीपूजा, तर २५ जानेवारी २०२७ रोजी सरस्वती पूजेचे आयोजन करण्यात आले आहे. नाशिक बंगाली असोसिएशनचे अध्यक्ष प्रशांत भट्टाचार्य, उपाध्यक्ष शेखर दत्ता, सरचिटणीस अमिताभ चक्रवर्ती आणि खजिनदार कल्लोल पुरकाईत यांच्यासह आयोजन समितीचे सदस्य महोत्सवाच्या यशस्वी नियोजनासाठी परिश्रम घेत आहेत. नाशिककरांनी कुटुंबीयांसह या भक्तिमय आणि सांस्कृतिक सोहळ्यात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vastu Tips: वास्तुशास्त्रानुसार घराजवळ 'ही' झाडे लावणे मानले जाते शुभ; जाणून घ्या घरासाठी फायदेशीर असणारी रोपे!

Pune News : झाडणकाम वाढले, रस्ते स्वच्छ, उकिरडे झाले कमी

Latest Marathi News Live Update : केतन अग्रवाल हत्या प्रकरण, उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती

Rapido Crime : बेकायदा प्रवासी वाहतूकप्रकरणी ‘रॅपिडो’वर गुन्हा दाखल

Shirur Crime : न्हावरेत कार चालकाला धमकी; मारहाण करून स्विफ्टच्या काचा फोडल्या.....

SCROLL FOR NEXT