Satyajit Tambe Esakal
नाशिक

Satyajit Tambe : निवडणुकीच्या प्रचारावेळी पैठणी अन् पैसे वाटले; तांबेंवर गंभीर आरोप

विधानपरिषदेच्या 2 पदवीधर, 3 शिक्षक मतदारसंघांचा आज निकाल लागणार

सकाळ डिजिटल टीम

विधानपरिषदेच्या 2 पदवीधर, 3 शिक्षक मतदारसंघांचा आज निकाल लागणार आहे. यातील सर्वाधिक चर्चेत असणाऱ्या नाशिक पदवीधर निवडणुकीचाही निकाल काही वेळात निकल हाती येणार आहे. या निकालावेळीच अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. सत्यजित यांनी प्रचारावेळी पैठणी आणि पैसे वाटल्याचा आरोप नाशिक पदवीधर अपक्ष उमेदवार सुभाष जंगले यांनी सत्यजित तांबेंवर आरोप केले आहेत.

नाशिक पदवीधरचे अपक्ष उमेदवार सुभाष जंगले यांनी सत्यजित तांबेंवर गंभीर आरोप केले आहेत. निवडणुकीचा प्रचार करताना सत्यजित तांबेंनी महिलांना पैठणी आणि पैसे वाटल्याचा आरोप जंगले यांनी केला आहे.

सुभाष जंगले बोलताना म्हणाले की, नाशिक पदवीधरची निवडणूक प्रचंड चुरशीची आहे. या निवणुकीची राज्यसह देशभर चर्चा रंगली. तुम्हा सर्वांना माहिती आहे. एका उमेदवाराने दोन्ही राष्ट्रीय पक्षांना फसवलं. दोन्ही पक्ष त्याच्या मागे उमेदवारी घेऊन फिरत आहेत. तरी त्यांनी त्यांची उमेदवारी न घेता दोन्ही पक्षांची मते घेण्याचा प्रयत्न केला असंही ते यावेळी म्हणाले आहेत.

नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी मतमोजणीस सुरुवात झाली आहे, सत्यजीत तांबे, शुभांगी पाटील यांच्यासह 16 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीमध्ये बंदिस्त झाले आहे. तर नाशिक पदवीधर निवडणूक सुरुवातीपासूनच राज्यात चर्चेचा विषय ठरला आहे. या निवडणूकीसाठी सत्यजीत तांबे यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुक अर्ज भरला. त्यांच्या या भूमिकेनंतर त्यांना काँग्रेस पक्षाने निलंबीत केले त्यामुळे विजयासाठी त्यांनी पैठणी आणि पैसे वाटल्याचाही आरोप करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

Adul News : शिवण क्लास न लावल्याच्या रागातून विवाहिने संपविले जीवन; दीड वर्षाच्या मुलाचे मातृछत्र हरपले

Strait of Hormuz: 'होर्मुझ'चं सोडा, इराणची नवीनच खेळी; अरबी समुद्रापर्यंत ‘रेस्ट्रिक्टेड झोन’ करण्याची योजना, जगावर नवं संकट

SCROLL FOR NEXT