नाशिक

सोने– चांदीच्‍या दरात

CD
दसऱ्याच्या मुहूर्तावर सुवर्ण बाजारात मोठी उलाढाल (उपशीर्षक) दर घसरणीमुळे खरेदीदारांना दिलासा; अनेकांची गुंतवणूक म्‍हणून खरेदी सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. २० ः साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असलेल्या दसरा सणाला मंगळवारी (ता. २०) सोने खरेदीसाठी सुवर्णनगरीत मोठी गर्दी झाली होती. सकाळपासून सराफ बाजारात ग्राहकांची गर्दी झाली होती. सोने व चांदीच्‍या भावात घसरण झाल्‍याने अनेकांनी सोने खरेदी केले. यामुळे दिवसभरात कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाल्‍याचा अंदाज सराफ व्‍यावसायिकांनी व्‍यक्‍त केला. दसऱ्याच्या मुहूर्तावर अनेकांनी गुंतवणूक म्‍हणून सोने खरेदी केली. गेल्‍या आठवड्याच्‍या सुरुवातीपासून सोने व चांदीचे भाव कमी झाले होते. मागील वर्षाच्या तुलनेत सोन्‍याचे भाव यंदा वाढले आहेत. मागील वर्षी सोने एक लाख २० हजार रुपयांपर्यंत होते. ते यंदा एक लाख ४५ हजार रुपयांपर्यंत होते. मागील वर्षाच्‍या तुलनेत २५ हजारांनी भाव वाढले असले, तरी मंगळवारी सोने खरेदी झाल्‍याने मोठी उलाढाल झाली. प्रामुख्‍याने आपट्याची पाने, नेकलेस, मनी, कानातले झुमके खरेदीकडे अधिक कल होता. काहींनी केवळ गुंतवणूक म्‍हणून सोन्‍याची चीप खरेदी केली. इन्‍फो सोने १,८००, तर चार हजारांनी स्‍वस्‍त दोन दिवस झाले सोने व चांदीचे भाव कमी झाले होते. सोमवारी (ता. १९) सोने व चांदीच्‍या भावात काहीशी वाढ झाली. तुलनेत दसऱ्याच्या मुहूर्तावर सोने व चांदीचे भावात मोठी घसरण झाली. सोमवारी सोन्याचा भाव एक लाख ४६ हजार ५०० रुपये (प्रतिदहा ग्रॅम, विनाजीएसटी) होता. त्यात मंगळवारी एक हजार ८०० रुपयांची घसरण होऊन सोने एक लाख ४४ हजार ७०० रुपयापर्यंत खाली आले, तर चांदीच्या भावात तब्‍बल चार हजार रुपयांची घसरण झाली. चांदीचे भाव दोन लाख १४ हजार (प्रतिकिलो विनाजीएसटी) रुपयांवर होते. त्यात चार हजार रुपयांनी कमी होऊन चांदी दोन लाख दहा हजार रुपयांपर्यंत खाली आली. काही दिवसांतील सोन्या-चांदीचे भाव तारीख---सोने प्रतिदहा ग्रॅम--- चांदी प्रतिकिलो (विनाजीएसटी) १५ ऑक्टोबर---१ लाख ४६ हजार ३००--- २ लाख १३ हजार १६ ऑक्टोबर---१ लाख ४६ हजार ८००--- २ लाख १५ हजार १७ ऑक्टोबर---१ लाख ४६ हजार ५००--- २ लाख १२ हजार १८ ऑक्टोबर---१ लाख ४६ हजार ५००--- २ लाख १२ हजार १९ ऑक्टोबर---१ लाख ४६ हजार ५००--- २ लाख १४ हजार २० ऑक्टोबर---१ लाख ४४ हजार ७००--- २ लाख १० हजार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dussehra Shopping: आज दसरा ;वाहन, सोने, गृह, इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे खरेदीवर ग्राहकांचा भर १,२०० कोटींची उलाढाल अपेक्षित

Latest Marathi News Live Update : रावण दहनाच्या कार्यक्रमाला दिल्लीच्या रामलीला मैदानात PM मोदींची हजेरी

Dussehra 2026: खंडेनवमी आणि दसरा यात नेमका काय फरक? शस्त्रपूजा नक्की कोणत्या दिवशी करावी?

Dussehra History : छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात दसरा कसा साजरा व्हायचा? इतिहासातील रंजक गोष्टी!

Diwali Bonus Rules: दिवाळीला कंपनीने बोनस देणं बंधनकारक? बोनस देत नसेल तर काय करायचं? पाहा, कायदा काय सांगतो

SCROLL FOR NEXT