नाशिक

दसऱ्याच्या मुहूर्तावर वाहन खरेदीला पसंती; दुचाकी, चारचाकींच्या बुकिंगमध्ये वाढ

CD
मेन फिचर -- (नवीन दुचाकी, कारचे संग्रहित छायाचित्र वापरावे) ---- शीर्षक दसऱ्याला ४०० वर नवीन वाहने धावणार रस्त्यावर मुहूर्त साधण्यासाठी ग्राहकांची लगबग; वाहन बाजारात उत्साहाचे वातावरण सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. १९ : विजयादशमी अर्थात दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर नवीन वाहन खरेदी करण्याची परंपरा आजही कायम आहे. यंदाही दसऱ्याच्या मुहूर्तावर दुचाकी आणि चारचाकी वाहन खरेदीसाठी ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणात बुकिंग करण्यात येत असल्याने वाहन बाजारात उत्साहाचे वातावरण आहे. नवीन वाहन घरी आणण्यासाठी अनेक ग्राहकांनी दसऱ्याचा मुहूर्त निवडला असून, वाहनांचे मॉडेल, रंग आणि उपलब्धता याबाबत ग्राहकांकडून वाहन विक्रेत्यांकडे चौकशी केली जात आहे. सध्या २०० च्यावर दुचाकी आणि २००च्या वर चारचाकी वाहनांची बुकींग दसऱ्याला झाली असून अनेक जण प्रतीक्षेत आहेत. दसरा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभमुहूर्त मानला जातो. या दिवशी नवीन वस्तू, सोने-चांदी तसेच वाहन खरेदीला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे अनेक कुटुंबे वाहन खरेदीचे नियोजन दसऱ्याच्या मुहूर्तावर करतात. काही ग्राहकांनी यापूर्वीच वाहन बुक केले असून, दसऱ्याच्या दिवशी त्याची डिलिव्हरी घेण्याची तयारी केली आहे. दुचाकी खरेदीकडे कल दुचाकी ही दैनंदिन प्रवासासाठी महत्त्वाची गरज बनली आहे. नोकरी, व्यवसाय, शिक्षण तसेच कौटुंबिक कामांसाठी दुचाकीचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. त्यामुळे दसऱ्याच्या मुहूर्तावर दुचाकी खरेदीसाठी तरुणांसह नोकरदार आणि मध्यमवर्गीय कुटुंबांकडून पसंती दिली जात आहे. पेट्रोलवरील दुचाकींबरोबरच इलेक्ट्रिक दुचाकींच्या पर्यायांचीही ग्राहकांकडून माहिती घेतली जात आहे. चारचाकींसाठी ‘वेटिंग’ कौटुंबिक प्रवास, सुरक्षितता आणि आरामदायी प्रवासाचा विचार करून ग्राहक विविध कंपन्यांच्या कारची तुलना करीत आहेत. हॅचबॅक, सेडान आणि एसयूव्ही प्रकारातील वाहनांना ग्राहकांकडून पसंती दिली जात आहे. मुहूर्ताची प्रतीक्षा दसऱ्याच्या दिवशीच वाहन घरी आणण्याची इच्छा असल्याने अनेक ग्राहक आधीच बुकिंग करतात. त्यानुसार वाहनाचा रंग, मॉडेल आणि डिलिव्हरीची तारीख निश्चित केली जाते. दसऱ्याच्या मुहूर्तावर वाहनपूजन करून नवीन वाहनाचा प्रवास सुरू करण्याची ग्राहकांची तयारी असते. चौकट सणासुदीच्या ऑफर्सकडे लक्ष दसरा आणि दिवाळीच्या पार्श्वभूमीवर वाहन कंपन्यांकडून विविध सवलती, एक्स्चेंज ऑफर, फायनान्स योजना आणि इतर लाभ दिले जातात. त्यामुळे नवीन वाहन खरेदी करू इच्छिणाऱ्या ग्राहकांसाठी हा काळ महत्त्वाचा ठरतो. कोट ग्राहक आपल्या बजेटनुसार वाहनांचे मॉडेल, मायलेज, फीचर्स आणि फायनान्सच्या सुविधांची माहिती घेत आहेत. दसऱ्याच्या दिवशी वाहनाची डिलिव्हरी मिळावी, अशी अनेक ग्राहकांची इच्छा असते. - आदित्य पगारिया, दुचाकी वाहन विक्रेता, जळगाव ---- कोट दसऱ्याच्या मुहूर्तावर नवीन कार खरेदी करण्याला ग्राहकांकडून विशेष पसंती दिली जाते. यंदाही ग्राहकांकडून विविध मॉडेल्स, एसयूव्ही आणि बजेटमधील कारबाबत चौकशी केली जात आहे. सुरक्षितता, मायलेज, आधुनिक फीचर्स आणि आकर्षक डिझाइन यांना ग्राहक प्राधान्य देत आहेत. - पीयूष बेदमुथा, चारचाकी वाहन विक्रेता, जळगाव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : बंटी पाटलांचा महायुतीला दणका! गोकुळ दूध संघ निवडणुकीत समविचारी आघाडीची सत्ता स्थापनेकडे वाटचाल

Petrol Diesel Price: आंतरराष्ट्रीय बाजारात घसरण; भारतात पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार का?

त्याने स्वतःच स्वतःचा जीव घेतला... लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या निधनावर भाऊ पुरुषोत्तम बेर्डे यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले- कुणाचंही ऐकलं नाही...

Gokul Election Result 2026 : ब्रेकिंग न्यूज! नविद मुश्रीफ पराभूत; सतेज पाटलांची आघाडी १४ जागांवर आघाडी

Namo Shetkari Yojana Latest Update : दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना दिलासा मिळणार? 5 हजारांची दुष्काळी मदत घोषित, पण नमो शेतकरी योजनेच्या 4 हजारांचे काय?

SCROLL FOR NEXT