नाशिक

धुळे दसरा उलाढाल

CD
धुळे ः टुडे १ साठी, मेन -- फोटो क्रमांक ः 33138 धुळे : दसऱ्यानिमित्त नाशिककर ज्वेलर्समध्ये दागदागिने खरेदी करताना ग्राहक. -- धुळ्यात ५० ऐवजी ३५ कोटींची उलाढाल! - यंदा २५ टक्क्यांची घट : सणासुदीतही बाजारपेठेवर दुष्काळाचे सावट गडद सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. २० : ऐन दसरा- विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर खरेदीचा उत्साह ओसंडून वाहणाऱ्या धुळ्याच्या मुख्य बाजारपेठेला यंदा दुष्काळाची झळ बसली आहे. जिल्ह्यात पुरेशा पावसाअभावी निर्माण झालेल्या दुष्काळी स्थितीमुळे यंदाच्या सण- उत्सवांच्या खरेदीवर मंदीचे सावट स्पष्टपणे दिसून आले. दसऱ्याच्या दिवशी बाजारपेठेत सरासरी ४२ ते ५० कोटी रुपयांच्या उलाढालीची अपेक्षा व्यक्त केली जात होती; मात्र प्रत्यक्षात अवघी ३५ ते ३८ कोटी रूपयांपर्यंतची उलाढाल झाली. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा बाजारातील उलाढालीत तब्बल २५ टक्क्यांची मोठी घट नोंदवली गेल्याची माहिती धुळे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष नितीन बंग यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली. ते म्हणाले, की जिल्ह्याची संपूर्ण अर्थव्यवस्था मुख्यत्वे कृषी क्षेत्रावर आधारित आहे. धुळे शहरातील मध्यवर्ती आणि जिल्ह्याची मुख्य बाजारपेठ ही केवळ स्थानिक ग्राहकांवर अवलंबून नसून, चार तालुक्यांच्या ग्रामीण भागातील शेतकरी व शेतमजुरांवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून असते. सर्वसाधारणपणे चांगला पाऊस झाला की दसऱ्याच्या मुहूर्तापर्यंत दोन ते तीन पिके शेतकऱ्यांच्या हाती आलेली असतात. पिकांचे पैसे हातात खेळू लागल्याने ग्रामीण भागातून खरेदीसाठी मुख्य बाजारपेठेत मोठी गर्दी होते. परंतु, यंदा पावसाने दिलेल्या हुलकावणीमुळे शेतीचे अतोनात नुकसान झाले असून, राज्य शासनाला धुळे जिल्ह्यात अधिकृतपणे दुष्काळ जाहीर करावा लागला आहे. याचा थेट फटका ग्रामीण भागाच्या खरेदीक्षमतेला बसला आणि त्याचे पडसाद शहरातील बाजारपेठेवरही उमटले. - फक्त वाहनांना पसंती विजयादशमीच्या दिवशी गृह- सदनिका खरेदी, सोने- चांदी, कपडे, इलेक्ट्रॉनिक व गृहोपयोगी वस्तू आणि विविध वाहनांच्या खरेदीकडे ग्राहकांचा मोठा कल असतो. यंदाच्या बाजारातील चित्राचा आढावा घेतला असता, केवळ वाहन खरेदी क्षेत्र सोडले तर इतर सर्वच क्षेत्रांत आशादायी वातावरण दिसून आले नाही. कापड बाजारात एरवी दसऱ्याला असणारी अभूतपूर्व गर्दी यंदा गायब दिसली. इलेक्ट्रॉनिक्स व गृहोपयोगी वस्तूंच्या दुकानांमध्येही चौकशी करणाऱ्यांची संख्या अधिक आणि प्रत्यक्ष खरेदी करणारे कमी, असे चित्र पाहायला मिळाले. सराफ बाजारातही फार वेगळी स्थिती नव्हती. - व्यावसायिक अपेक्षांवर पाणी वार्षिक उलाढालीच्या दृष्टीने दसऱ्याचा मुहूर्त धुळ्यातील व्यापाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. मात्र, अवघ्या ३५ ते ३८ कोटींवरच समाधान मानावे लागल्याने व्यापारी वर्गात चिंतेचे वातावरण दिसले. पुढील काळात येणाऱ्या दिवाळीच्या तोंडावर तरी बाजारपेठेत सुधारणा होईल का, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. दुष्काळाची भीषणता किती खोलवर पोहोचली आहे, याचे ज्वलंत उदाहरण दसऱ्याच्या दिवशी धुळे बाजारपेठेत पाहायला मिळालेल्या या मंदीवरून अधोरेखित झाले आहे, असेही श्री. बंग यांनी नमूद केले. - १४-१ ...कोट... १४-१ फोटो क्रमांक ः 33128 १४-१ धुळ्याची अर्थव्यवस्था पूर्णपणे ग्रामीण भागातील शेती आणि शेतकऱ्यांवर विसंबून आहे. यंदा पावसाच्या हुलकावणीमुळे शेतीचे नुकसान होऊन दुष्काळ जाहीर करावा लागल्याने, ग्रामीण भागाच्या खरेदीक्षमतेवर मोठा परिणाम झाला आहे. दसऱ्याच्या मुहूर्तावर बाजारातील उलाढाल २५ टक्क्यांनी घटून ५० कोटींवरून ३५ कोटींवर येणे, ही केवळ व्यापारी मंदी नसून दुष्काळाची भीषणता शहराच्या मुख्य बाजारपेठेपर्यंत किती खोलवर पोहोचली आहे याचेच हे ज्वलंत उदाहरण आहे. - नितीन बंग, अध्यक्ष, धुळे व्यापारी महासंघ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कितीही दरोडेखोर आले तरी आमचा भगवा कोणीही चोरू शकत नाही; दसऱ्या मेळाव्यात उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

"आम्हाला पक्षाचे संख्याबळ वाढवून एकनाथ शिंदेंना पुन्हा सिंहासनावर बसवायचे आहे"; शिवसेनेच्या नेत्यांचे मोठे विधान!

रामराज्य म्हणजे नेमकं काय? विजयादशमीच्या भाषणात पंतप्रधान मोदींनी सांगितला अर्थ

टायगर श्रॉफ हल्ला प्रकरणात मोठा खुलासा! आधी दुसऱ्या सेलिब्रिटीला संपवण्याचा होता प्लॅन, चौकशीत काय समोर आलं?

Dussehra Shopping: आज दसरा ;वाहन, सोने, गृह, इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे खरेदीवर ग्राहकांचा भर १,२०० कोटींची उलाढाल अपेक्षित

SCROLL FOR NEXT