नाशिक

बाजारपेठा गजबजल्या; सोने-चांदीपासून वाहनांपर्यंत खरेदीचा उत्साह

CD
पान एक मेन ------------------ 33145 नाशिक : येथील मयूर अलंकारमध्ये दागिन्यांची खरेदी करताना ग्राहक. विजयादशमीच्या मंगलपर्वाने शहरात चैतन्याची लहर सीमोल्लंघन, धार्मिक विधी आणि देवीदर्शनासाठी भाविकांची गर्दी सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता.२० : साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानल्या जाणाऱ्या विजयादशमीच्या मंगलपर्वाने शहरात उत्साह, चैतन्य आणि भक्तिमय वातावरणाची लहर पसरली. दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर नवीन वस्तूंची खरेदी, सोने-चांदीचे दागिने, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू आणि वाहनांच्या खरेदीसाठी नागरिकांनी बाजारपेठा व विविध शोरूममध्ये गर्दी केली होती. दुसरीकडे, मंदिरांमधील धार्मिक कार्यक्रम, सीमोल्लंघनासाठीची लगबग, देवीदर्शनासाठी भाविकांची रीघ आणि घराघरांत पार पडणारे पारंपरिक विधी यामुळे शहरात सर्वत्र मांगल्य आणि उत्साहाचे वातावरण अनुभवायला मिळाले. दसऱ्याच्या परंपरेतील सीमोल्लंघनासाठीही नागरिकांनी मोठ्या उत्साहाने बाहेर पडत आपट्याची पाने अर्थात सोने एकमेकांना देत विजयादशमीच्या शुभेच्छा दिल्या.नवरात्रोत्सवातील भक्तिमय वातावरणानंतर विजयादशमीच्या रूपाने मांगल्य, विजय आणि नव्या संकल्पांचा संदेश देणारा हा सण शहरवासीयांनी मोठ्या उत्साहात साजरा केला. शहरातील मंदिरांमध्ये दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली होती. सीमोल्लंघन करून घरी परतलेल्या कुटुंबीयांचे सुवासिनींनी औक्षण करून स्वागत केले. ------------ विजयादशमीला सोनेखरेदीत उत्साह सोन्या-चांदीच्या वाढलेल्या दरानंतरही नाशिकमधील सराफ बाजारात खरेदीसाठी ग्राहकांचा उत्साह दिसून आला. विशेषतः २४ कॅरेट सोन्याच्या तुलनेत २२ कॅरेट सोन्याच्या तयार दागिन्यांना ग्राहकांकडून अधिक पसंती दिली जात असल्याचे स्थानिक सराफ व्यावसायिकांनी सांगितले. सध्या २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम १ लाख ४५ हजार ४०० रुपये, तर २२ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम १ लाख ३४ हजार ६०० रुपये आहे. चांदीचा दर प्रतिकिलो २ लाख १५ हजार ५०० रुपये इतका आहे. यंदा गुंतवणुकीसाठी सोने खरेदी करण्यापेक्षा सणानिमित्त वापरता येतील असे दागिने खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल दिसून येत आहे. त्यामुळे पारंपरिक वापरासाठी २२ कॅरेट सोन्याचे दागिने खरेदी करण्याला ग्राहक प्राधान्य देत आहेत. विजयादशमीच्या मुहूर्तावर सोने खरेदी करणे शुभ मानले जात असल्याने, दरवाढ असूनही या दिवशी सराफ बाजारात खरेदीची लगबग पाहायला मिळाली. -------- विजयादशमीसारख्या दिवशी सोनेखरेदीसाठी ग्राहकांची गर्दी सामान्य आहे. २२ कॅरेटच्या तयार वस्तू घेण्याकडे ग्राहकांचा कल आहे. पूर्वी ग्राहक २४ कॅरेटच्या सोन्यामध्ये गुंतवणूक करायचे ते आता होताना दिसत नाही. -अमोल दाभाडे-जालनेकर, सराफ व्यावसायिक सकाळी भाव खाणारा झेंडू सायंकाळी कोसळला विजया दशमी दसरानिमित्त झेंडूच्या फुलांनी बाजारपेठ पूर्णत: सजली. शहरातील प्रत्येक मुख्य रस्त्यावर केशरी, पिवळ्या रंगाच्या झेंडूच्या फूल विक्रेत्यांनी एकच गर्दी केल्यामुळे सकाळी भाव खाणारा झेंडू सायंकाळी कोसळला. सायंकाळी बाजारात १०० रुपये क्रेट (जाळी), ५० रुपये शेकडा तर २० रुपयांना फुलांची माळ मिळाली. गंगेवर पहाटे ५ पासून फूल विक्रेत्यांनी एकच गर्दी केली. होलसेल भावात त्यांनी सुट्या फुलांची विक्री केल्यामुळे अनेकांना येथून खरेदी केली. ट्रक्स, ट्रॅक्टरमधे क्रेट भरून आणत ग्राहकांचा प्रतिसाद बघून कमी अधिक दराने त्याची विक्री झाली. पावसाचे प्रमाण यंदा कमी असल्यामुळे झेंडूच्या फुलांना पोषक वातावरण तयार झाले. त्यामुळे बाजारात झेंडूची आवक मोठ्या प्रमाणात झाल्याचे दिसून आले. बाजारात यंदा विविध प्रकारचे झेंडू बघायला मिळाले. त्यासोबतच फुलांची माळ, सुटी फुले व विविध प्रकारच्या फुलांपासून तयार केलेल्या माळा दिसून आल्या. जेणेकरून त्यांचा तत्काळ वापर होतो आणि ग्राहकांचे कष्ट व वेळ वाचतो. -ऋतुराज देवरे, ग्राहक --------- मोबाईल, टीव्ही, एसीला पसंती विजयादशमीला नाशिककरांनी इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या खरेदीचे सीमोल्लंघन केले. बाजारपेठेत विविध प्रकारच्या मोबाईल नागरिकांची सर्वाधिक पसंती लाभली. टीव्ही, फ्रीज आणि एसीलाही वाढती मागणी पाहायला. इलेक्ट्राॅनिक्स वस्तूंच्या बाजारपेठ दिवसभरात कोट्यवधींची उलाढाल झाली. ग्राहकांचा कल लक्षात घेता मोबाईल्स्‌ शोरुम्सकडून विविध आकर्षक सवलती देण्यात आल्या. त्यामुळे मोबाईलप्रेमींचा दसरा द्विगुणत झाला. या व्यतिरिक्त बाजारपेठेत फ्रीज, टीव्ही तसेच एसी, कुलरसारख्या वस्तूंनाही मोठ्या प्रमाणात मागणी पाहायला मिळाली. विशेष करून ३२ ते ४३ इंचापासून ते ६५ इंच तसेच त्यावरील ॲन्ड्राईड टीव्हीला ग्राहकांची पसंती मिळाली. तर डबल डोअरच्या फ्रीज घेण्याकडे नागरिकांचा कल दिसून आला. कुलर व इलेक्ट्रॉनिक्स होम अल्पायन्सेस्‌ची खरेदीचाही नागरिकांनी आनंद घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDW vs ZIMW 3rd T20I: भारताचा दणदणीत विजय; हरमनप्रीत, शफाली वर्माची फटकेबाजी; झिम्बाब्वेविरुद्धची मालिका ३-० ने खिशात

शनि मार्गी होताच ३ राशींचं नशीब पालटणार! रखडलेली कामं पूर्ण होणार, धनलाभाचे योग

Dasara Melava 2026: संजय राऊतांचा अमित शाहांवर हल्लाबोल; 'लॉरेन्स बिश्नोई अस्तित्वात नाही, अमित शाह हेच लॉरेन्स बिश्नोई'

Eknath Shinde : "शेतकऱ्यांच्या लेकींच्या लग्नाचा सर्व खर्च आमचा"; दसरा मेळाव्यातून एकनाथ शिंदेंची सर्वात मोठी घोषणा!

INDW vs ZIMW 3rd T20I: १० चौकार, ५ षटकार अन् ९१ धावा! हरमनप्रीत कौर रडली, चेहरा लपवताना दिसली; म्हणाली, त्या शब्दांनी...

SCROLL FOR NEXT