मेन
फोटो : A15037
नाशिक : वडाळ नाका ते द्वारका भुयारी मार्गाच्या बोगद्याजवळील रस्त्याचे प्रगतिपथावर असलेले काम.
--
फोटो : A15036
नाशिक : वाहतुकीसाठी ६० टक्के खुला झालेला द्वारका चौक
--
द्वारका चौक वाहतुकीसाठी ६० टक्के खुला
भुयारी मार्गाचे काम अंतिम टप्प्यात; इतर कामे प्रगतिपथावर
सकाळ वृत्तसेवा
जुने नाशिक, ता. १८ : भुयारी मार्गाचे तीनही स्लॅबचे मुख्य काम पूर्ण झाल्याने द्वारका चौक वाहतुकीसाठी सुमारे ६० टक्के खुला करण्यात आला आहे. उर्वरित ४० टक्के मार्गही खुला करण्यासाठी परिसरातील रस्त्यांच्या कामांचे नियोजन केले जात आहे. द्वारका ते नाशिक रोड मार्गाचे काम सध्या सुरू आहे. त्याचप्रमाणे सारडा सर्कलकडून द्वारका भुयारी मार्गात जाणाऱ्या मार्गाचे कामही प्रगतिपथावर सुरू आहे.
वाहतूक कोंडी लक्षात घेता भुयारी मार्गाचे काम पूर्ण झाले नसले तरी भुयारी मार्गावरील द्वारका चौकास जोडणारे काही मार्ग वाहतुकीसाठी खुले करण्यात आले आहे. १५ ऑक्टोबरपर्यंत संपूर्ण द्वारका चौक वाहतुकीसाठी खुला करण्याचे नियोजन होते. मात्र काही भागांचे काम पूर्ण झालेले नसल्याने आतापर्यंत मुंबई ते धुळे, धुळे ते मुंबई अशा मुख्य मार्गासह नाशिक रोड ते द्वारका असे मार्ग वाहतुकीसाठी खुले करण्यात आल्याने चौकाच्या ६० टक्के भागावर वाहतूक सुरळीत सुरू आहे. उर्वरित ४० टक्के कामाचेही नियोजन करण्यात आले आहे. द्वारका ते पुणे या मार्गाचे काम अंतिम टप्प्यात सुरू आहे. येत्या काही दिवसातच रस्त्याचे काम पूर्ण झाल्याने या मार्गावरील वाहतूक सुरळीत होणार आहे. सारडा सर्कलकडून द्वारका मार्गावरील भुयारी मार्गाचे कामे अद्याप पूर्ण झालेले नसल्याने या भागातील मार्ग अद्याप बंद आहे. द्वारका चौकात या मार्गावरील भुयारी मार्गाचे काम सध्या प्रगतिपथावर सुरू आहे. तर वडाळा नाका ते भुयारी मार्गापर्यंत द्वारकाकडून वडाळा नाकाकडे जाणाऱ्या रस्त्याचे कामही अर्धे झाले आहे.
---चौकट
१ जानेवारीपर्यंत नियोजन
केवळ वडाळा नाक्याकडून द्वारकाकडे येणाऱ्या मार्गाचे काम अद्यापही पूर्णपणे बाकी आहे. या मार्गांना जोडणाऱ्या बोगद्याच्या मार्गाचे काम पूर्ण होताच या दोन्ही रस्त्यांचे काम करून १ जानेवारी २०२७ पर्यंत बोगद्यासह संपूर्ण द्वारका चौक वाहतुकीसाठी खुला करण्याचे नियोजन संबंधित विभागाकडून सुरू आहे. त्यामुळे शहरवासियांची वाहतूक कोंडीची समस्या सुटण्यास मदत होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.