फोटो २ कॉ फक्त
VNI26B13223
दिंडोरी ः दिव्यांगांना ई-शिधापत्रिकांचे वितरण करताना तहसीलदार मुकेश कांबळे, पुरवठा अधिकारी अक्षय लोहारकरड, दिव्यांग साधना संघाचे मच्छींद्र मोरे आदींसह लाभार्थी.
-------------------
२०-१
दिंडोरीत दिव्यांगांना
ई-शिधापत्रिका वाटप
------------
सकाळ वृत्तसेवा
वणी, ता. १५ : सेवा संकल्प अभियानांतर्गत दिव्यांग लाभार्थ्यांना अंत्योदय अन्न योजनेचा लाभ देत ई-शिधापत्रिकांचे दिंडोरी येथे वितरण करण्यात आले. तहसीलदार मुकेश कांबळे यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात ई-शिधापत्रिकांचे वाटप करण्यात आले.
तालुका पुरवठा अधिकारी अक्षय लोहारकर, दिव्यांग साधना संघाचे अध्यक्ष मच्छिंद्र मोरे, तालुकाध्यक्ष दीपक भोये, सचिव संतोष रोकडे आणि कांचन गांगुर्डे उपस्थित होते. आर्थिकदृष्ट्या दुर्बल व पात्र कुटुंबांना सवलतीच्या दरात अन्नधान्य उपलब्ध करून देणाऱ्या अंत्योदय अन्न योजनेचा लाभ दिव्यांग बांधवांपर्यंत पोहोचविण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. शासकीय योजनांची माहिती, पात्रता आणि आवश्यक कागदपत्रांबाबत मार्गदर्शन करून लाभ मिळवून देण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न केले जात असल्याचे पुरवठा अधिकारी लोहारकर यांनी सांगितले. जयंत लहरे, बापू घोडेस्वार, गोकुळ गांगुर्डे, सुनीता पवार यांच्यासह तहसील कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी आणि दिव्यांग लाभार्थी उपस्थित होते.
------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.