vaishali veer zankar esakal
नाशिक

शिक्षणाधिकारी लाच प्रकरण : डॉ. वीर- झनकरना अखेर जामीन मंजूर

विनोद बेदरकर

नाशिक : आठ लाख रुपयांच्या लाच प्रकरणातील (bribe case) संशयित माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली वीर- झनकर (dr vaishali veer jhankar) यांना सोमवारी (ता. २३) जिल्हा न्यायालयाने (district court) अखेर जामीन मंजूर केला. मात्र, दर सोमवारी त्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात उपस्थित राहण्याचे आदेश न्यायालयाने दिले. रेवती शिक्षण संस्थेच्या नोव्हेंबर २०२० मध्ये २० टक्के मंजूर अनुदानानुसार ३२ शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे नियमित वेतन सुरू करण्याबाबत कार्यादेश काढण्यासाठी डॉ. वीर-झनकर यांनी आठ लाखांची लाच मागितल्याचा आरोप आहे. त्यांचा वाहनचालक ज्ञानेश्‍वर येवले आणि मध्यस्थी करणारा राजेवाडी येथील शिक्षक पंकज दशपुते यांना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून आठ लाख रुपये स्वीकारताना पकडले होते. या दोघांनी डॉ. वीर- झनकर यांचे नाव सांगितल्याने त्यांची चौकशी करण्यात आली होती.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागात हजेरीचे आदेश

यासोबतच प्राथमिक शिक्षकाचाही यात समावेश असल्याने त्याचीदेखील चौकशी होऊन कारवाई करण्यात आली होती. दरम्यान, चालक ज्ञानेश्‍वर येवले आणि प्राथमिक शिक्षक पंकज दशपुते यांना यापूर्वीच जामीन मंजूर झाला आहे. पोलिसांनी अटक केल्यानंतर पहिल्या दिवशी डॉ. वीर- झनकर गायब झाल्या होत्या. त्यानंतर पोलिस कोठडीदरम्यान प्रकृती बिघडल्याने जिल्हा रुग्‍णालयात दाखल झाल्या होत्या. त्यामुळे आठवड्यापासून चर्चेत असलेल्या डॉ. वीर-झनकर यांना अखेर सोमवारी जामीन मंजूर झाला. सुनावणीदरम्यान जामीन मंजूर होत असताना सरकार पक्षाकडून आक्षेप घेण्यात आला.

वैशाली झनकर-वीर अखेर निलंबित

जामीन मंजूर झाल्‍याने दिलासा मिळालेला असतानाच डॉ. वैशाली वीर- झनकर यांना निलंबनाच्या कारवाईचा झटका बसला आहे. सोमवारी (ता. २३) मंत्रालयातून निलंबन आदेश नाशिक शिक्षण उपसंचालक कार्यालयास प्राप्त झाल्‍याचे सूत्रांनी सांगितले. कधी सुट्या, तर कधी प्रस्‍तावातील तांत्रिक त्रुटींमुळे निलंबन आदेश जारी करण्यात अडथळे येत होते. न्‍यायालयीन व पोलिस कारवाईच्‍या सविस्‍तर तपशीलासह पुन्‍हा नव्‍याने निलंबनाचा सुधारित प्रस्‍तावदेखील सादर केला होता. अखेर डॉ. वीर- झनकर यांच्‍यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. दरम्‍यान, माध्यमिक शिक्षणाधिकारीपदाचा प्रभारी पदभार सोमवारी सहाय्यक उपसंचालक पुष्पावती पाटील यांनी स्‍वीकारला आहे.

शिक्षकांच्‍या वेतनाचा प्रश्‍न अखेर निकाली

लाच प्रकरणातील मुख्य संशयित वैशाली झनकर-वीर यांच्‍या पदाचा प्रभारी पदभार सहाय्यक उपसंचालक पुष्पावती पाटील यांनी सोमवारी (ता. २३) स्‍वीकारला. पदभार स्वीकारताच त्यांनी शिक्षकांच्या वेतन बिलावर स्वाक्षरी केली. यामुळे शिक्षकांच्‍या वेतनाचा प्रश्‍न निकाली लागला आहे. माध्यमिक शिक्षण विभागातर्फे जिल्‍ह्यातील सुमारे १८ हजार शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन बिल मंजूर केले जाते. प्रशासकीय प्रक्रियेचा भाग म्‍हणून वेतनबिले शिक्षणाधिकाऱ्यांच्‍या स्‍वाक्षरीने अंतिम केली जातात. मात्र, शिक्षणाधिकारी वैशाली झनकर-वीर यांना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केल्‍यापासून माध्यमिक शिक्षण विभागाचे काम बारगळले होते. ऐन सणासुदीत शिक्षकांचे वेतन रखडल्‍याने संताप व्‍यक्‍त होत होता. शिक्षण आयुक्तांनी पुष्पावती पाटील यांची प्रभारी नियुक्ती केली. नंतर त्यांना सर्वप्रथम वेतनाचा प्रश्‍न सोडविण्याचे आदेश दिले. माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयात न येता शिक्षण उपसंचालक कार्यालयातच त्‍यांनी वेतनबिलांवर स्‍वाक्षऱ्या केल्‍याचे समजते. यामुळे जिल्‍हाभरातील शिक्षकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT