MLA Dilip Borse esakal
नाशिक

Nashik: मुख्यमंत्री सुंदर शाळा अभियान प्रभावीपणे राबवा; दिलीप बोरसे, चित्रा देवरे यांचे आवाहन

या अभियानातील शाळांसाठी विद्यार्थिकेंद्रित उपक्रम, शाळा व्यवस्थापनाकडून आयोजित उपक्रम यासाठी १०० गुण असतील.

सकाळ वृत्तसेवा

नामपूर : बागलाण तालुक्यातील सर्व शाळांनी 'मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियान प्रभावीपणे राबवावे असे आवाहन आमदार दिलीप बोरसे, बागलाण पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी चित्रा देवरे यांनी केले आहे. (Effectively implement CM Beautiful School Campaign Appeal by Dilip Borse Chitra Deore Nashik)

आमदार बोरसे म्हणाले,‘ शाळांमध्ये स्पर्धात्मक वातावरण निर्माण होऊन विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, आनंददायी व प्रेरणादायी वातावरण तयार व्हावे, यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेंतर्गत ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ हे अभियान राज्यभर राबविले जात आहे.

या शाळांमध्ये पायाभूत सोयी सुविधा वाढविणे, शाळांमध्ये शिक्षणाबाबत स्पर्धात्मक वातावरण तयार करणे, विद्यार्थ्यांचा निर्णय प्रक्रियेत सहभाग वाढविणे, आरोग्य, पर्यावरण, कौशल्य विकास, आर्थिक साक्षरता या विषयांवर उपक्रम राबविण्यात येत आहेत.

‘या विविध उपक्रमांसाठी शाळांना प्रोत्साहित करणे, विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्याबरोबरच शिक्षणासाठी आवश्यक आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरास प्रोत्साहन देणे, क्रीडा, आरोग्य, स्वच्छतेचे महत्त्व, राष्ट्रप्रेम, व्यावसायिक शिक्षणाचे महत्त्व तसेच शाळेविषयी कृतज्ञतेची भावना निर्माण करणे हे या अभियानाचे मुख्य उद्दिष्ट असल्याचे सौ. देवरे यांनी सांगितले.

हे अभियान ४५ दिवस राबविले जाईल. या अभियानातील शाळांसाठी विद्यार्थिकेंद्रित उपक्रम, शाळा व्यवस्थापनाकडून आयोजित उपक्रम यासाठी १०० गुण असतील. शाळांना तालुका, जिल्हा तसेच विभागनिहाय पारितोषिके देण्यात येणार आहेत.

राज्यस्तरावर तसेच सर्व व्यवस्थापनाच्या शाळासाठी पहिले पारितोषिक ५१ लाखांचे असेल. दुसरे पारितोषिक २१ लाख आणि तिसरे ११ लाखांचे असणार आहे.

राज्यात २०२०-२१ पासून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा ही पूर्णतः: राज्य पुरस्कृत योजना शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांसाठी राबविण्यात येत आहे.

भौतिक सुविधांचे निर्माण, शैक्षणिक गुणवत्तेतील वाढ व प्रशासकीय सुधारणा अशी प्रमुख क्षेत्रे या योजनेसाठी निश्चित करण्यात आली आहेत.

"बागलाण तालुक्यात मुख्यमंत्री शाळा अभियानात सहभागी होणाऱ्या शाळांची ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया सुरू आहे. विविध उपक्रमांचे आयोजन ४५ दिवसांत होईल. अभियानात सहभागी होणाऱ्या शाळांना विद्यार्थीकेंद्रित उपक्रमांच्या आयोजनासाठी ६० गुण व शाळा व्यवस्थापनाकडून आयोजित आरोग्य, आर्थिक साक्षरता व कौशल्य विकास, भौतिक सुविधा, तंबाखू मुक्त, प्लास्टिक मुक्त शाळा अशा उपक्रमांसाठी ४० गुण असे १०० गुण देण्यात येतील."

- चित्रा देवरे, गटशिक्षणाधिकारी बागलाण

असे असेल शाळांना गुणदान...

- शाळा व परिसराच्या सौंदर्यीकरणासाठी १० गुण,

- विद्यार्थ्यांच्या निर्णय प्रक्रियेतील सहभागासाठी १५ गुण,

- शैक्षणिक गुणवत्ता व व्यक्तिमत्त्व विकास उपक्रमांसाठी १० गुण,

- शाळेची इमारत व परिसराची स्वच्छतेसाठी १० गुण,

- राष्ट्रीय एकात्मतेस प्रोत्साहन देण्यासाठीच्या उपक्रमास ५ गुण

- विविध क्रीडास्पर्धांच्या आयोजनासाठी १० गुण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Award List: ऑरेंज-पर्पल कॅप आणि बक्कळ पैसा... पुरस्कार सोहळ्यातही वैभव सूर्यवंशीचाच डंका! पाहा विजेत्यांची संपूर्ण यादी

IPL 2026 Final: "जितेश राव, कसं वाटतंय?" हर्षा भोगलेंच्या प्रश्नावर RCB च्या Jitesh Sharma चं मराठीतून उत्तर; म्हणाला...

Virat Kohli Reaction : "आता मॅच जिंकवण्यासाठी मला एकट्यालाच मैदानात उतरावं लागत नाही!" विराट कोहली भावुक

Vaibhav Sooryavanshi : १५ वर्षाच्या पोराने मैदान गाजवले... Orange Cap सह ५ पुरस्कार जिंकल्यानंतर म्हणाला, या पर्वात शिकलो की...

IPL 2026: वैभव सूर्यवंशीला ५ पुरस्कार अन् पैशांचा पाऊस! १५ वर्षांच्या पोराला कारसह BCCI कडून किती रुपयांचे बक्षीस मिळाले?

SCROLL FOR NEXT