नाशिक

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिक दौऱ्यावर

CD
टूडे कॉमन (एकनाथ शिंदे फोटो घ्यावा) ------------ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नाशिकच्या दौऱ्यावर दुष्काळग्रस्तांना शिधा वाटप, कुंभमेळा आढावा बैठक सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. २५- राज्याचे उपमुख्यमंत्री व शिवसेना मुख्यनेते एकनाथ शिंदे सोमवारी (ता. २६) जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन, संत-महंतांशी संवाद, आदिवासी भागातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना शिधा वाटप, सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पूर्वतयारीचा आढावा व गंगापूर रोड समांतर रस्ते कामाचा शुभारंभ त्यांच्या हस्ते होणार आहे. उपमुख्यमंत्री शिंदे सकाळी ९.३० वाजता त्र्यंबकेश्वर येथे मंदिरात दर्शन घेऊन संत-महंतांशी चर्चा करणार आहेत. श्री चंद्र लॉन्स, त्र्यंबकेश्वर येथे संवाद साधतील. हरसूल येथील महानुभाव दत्त मंदिर, दलपतपूर रोड येथे दुपारी १२ वाजता शिवसेनेच्या वतीने आदिवासी भागातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना शिधा वाटपाचा कार्यक्रम होणार आहे. दुपारी २ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे दुष्काळी परिस्थितीचा आढावा आणि आगामी नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पूर्वतयारीसंदर्भात बैठक होणार आहे. या बैठकीत विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरण आयुक्त शेखर सिंह, महापालिका आयुक्त मनिषा खत्री उपस्थित राहतील. यावेळी कुंभमेळा कामांचा आढावा घेतील. ------------- समांतर गंगापूर रोड कामाचा शुभारंभ नाशिक शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या नवीन समांतर गंगापूर रोड भूमिपूजन सोहळा दुपारी ३ वाजता सुरुवात होणार आहे. कॅनॉल रोड परिसर, तिरुमला हाइट्स, पाईप लाइन रोड, गंगापूर रोड येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. --------------- मविप्र वसतिगृहाचे उद्घाटन दुपारी चारला उदोजी मराठा बोर्डिंग कॅम्पस, गंगापूर रोड येथे कर्मवीर अँड. बाबूराव गणपत ठाकरे अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वसतिगृहाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणार आहे. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे, शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी, आमदार सुहास कांदे, उपमहापौर विलास शिंदे, यांच्या समवेत शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याची माहिती उपनेते, जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते यांनी दिली. -----------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Without Fear or Favour Book Controversy : "विदाउट फ़ियर ऑर फ़ेवर" पुस्तकातील दाव्यांची जोरदार चर्चा; न्यायपालिकेच्या स्वातंत्र्यावरून नवा वाद!

सूर्याचा राहूच्या नक्षत्रात प्रवेश; वृषभसह ५ राशींना नोकरी अन व्यवसायात आर्थिक लाभ

IMD Weather Alert : चक्रीवादळाने रौद्ररूप धरले! ताशी १०० किमी वेगाने सुटणार सोसाट्याचा वारा; 'या' राज्यांत मुसळधार पाऊस, महाराष्ट्रात काय घडणार?

फ्लिपकार्टच्या गोदामातून ९८० सॅमसंग मोबाईल चोरीला; पुरावा मिळू नये म्हणून CCTV चा डीव्हीआरही पळवला...

Jamgaon News: रविवारी सुट्टी असतानाही सीईओंची जामगावला भेट; अपघातात मृत सेविकेच्या कुटुंबीयांचे सांत्वन

SCROLL FOR NEXT