नाशिक

एसआयआर प्रक्रिया रद्द करावी

CD
मेन फोटो : H33436 -- मुख्य निवडणूक आयुक्तांचा राजीनामा घ्या विरोधक, सामाजिक संघटनांचा एल्गार; एसआयआर प्रक्रिया रद्दची मागणी सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. २४ : देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा द्यावा, मतदारयादी विशेष पुर्नरिक्षण प्रक्रिया (एसआयआर) तातडीने रद्द या प्रमुख मागण्यांसाठी विरोधी पक्ष आणि विविध सामाजिक संघटनांनी शनिवारी (ता. २४) मोर्चा काढला. या वेळी जिल्हा प्रशासनाला मागण्यांचे निवेदन देण्यात आले. देशभरात सध्या एसआयआरचा मुद्दा गाजत आहे. या प्रश्नावरून शहरातील विरोधी पक्ष व सामाजिक संघटनांनी देशातील ‘लोकशाही वाचवा’ म्हणून मोर्चा काढला. या मोर्चाप्रसंगी एसआयआर प्रक्रियेवर बोट ठेवताना ती लोकशाही मूल्य आणि नागरिकांना मतदानाच्या मूलभूत हक्काला थेट धक्का लावणारी ठरल्याचा आरोप करण्यात आला. या प्रक्रियेअंतर्गत मतदार याद्यांमधून सुमारे १३ कोटी नागरिकांची नावे संशयास्पदरीत्या वगळल्याने ते मतदानाच्या हक्कापासून वंचित राहण्याची भिती आहे. निवडणूक आयोगातील इतर आयुक्तांनी या कार्यपद्धतीवर १४ वेळा लेखी आक्षेप नोंदवले असताना त्याची दखल का घेतली नाही. तसेच वय आणि पत्त्याच्या विसंगतीचे कारण देत लाखो मतदारांना नोटिसा बजावत मानसिक त्रास दिला जात आहे, असे प्रश्‍न विरोधकांनी उपस्थित केले. सीबीएस येथील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून मोर्चाला प्रारंभ झाला. शिवाजी रोड, नेहरू गार्डन, महात्मा गांधी रोडमार्गे जिल्हाधिकारी कार्यालय येथे मोर्चाचा समारोप झाला. त्यानंतर शिष्टमंडळातर्फे प्रशासनाला निवेदन देण्यात आले. मोर्चात खासदार डॉ. शोभा बच्छाव, काँग्रेसचे शहराध्यक्ष नीलेश खैरे, जिल्हाध्यक्ष रमेश कहांडोळे व भारत टाकेकर, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष छबू नागरे, भाकपचे डी. एल. कराड, राजू देसले, मनसेचे राकेश परदेशी यांच्यासह विविध सामाजिक संघटना, विद्यार्थी संघटना तसेच राजकीय पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले. ---चौकट जोरदार घोषणाबाजी मोर्चात काँग्रेस, माकप, भाकप, मनसे, आम आदमी पक्षासह विविध राजकीय पक्ष व संघटना सहभागी झाल्या. यावेळी मोर्चेकऱ्यांनी ज्ञानेश कुमार राजीनामा, राजीनामा द्या. सरकार जब जब डरती है पोलीस को आगे करती हे अशा घोषणा दिल्या. या घोषणांनी परिसर दणाणून गेला. एसआयआर प्रक्रिया तात्काळ रद्द करावी, आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा घ्यावा, निवडणूक आयुक्त नियुक्तीसाठी स्वतंत्र यंत्रणा तयार करावी आदी प्रमुख मागण्या या वेळी करण्यात आल्या. ---------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market: ट्रेडिंग गुरु अवधूत साठेंला SEBIचा दणका! 546 कोटी परत करण्याचे आदेश, 67 कोटी व्याज अन् 11.5 कोटींचा दंडही भरावा लागणार

Piyush Goyal : संशोधन-उद्योजक जोडण्यासाठी गोयल यांचा चार कलमी कार्यक्रम

IND vs NZ 2nd T20I Live: श्रेयस अय्यरचा त्रिफळा, अक्षर पटेलचा अफलातून झेल! मिचेल सँटनरने ११ चेंडूंत ३ विकेट्स घेतल्या, Video

Latest Marathi News Live Update : पंतप्रधान मोदी उद्या वाराणसी दौऱ्यावर; कसा असेल कार्यक्रम?

टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात नवा खुलासा! सुरतमध्ये लपवलेले शस्त्र जप्त, 4 नवीन संशयितांना अटक

SCROLL FOR NEXT