नाशिक

विद्युत खांबावर शॉक लावुन वायरमनचा मृत्यु

CD
NSK26H33484 : किरण सपकाळे ---- वीजखांबावर काम करताना शहरात वायरमनचा मृत्यू औद्योगिक वसाहत परिसरातील घटना सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता.२४ : वीजखांबावर काम करताना विजेचा धक्का लागून किरण दत्तात्रय सपकाळे (वय ४२, रा. आशाबाबा नगर) या वायरमनचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (ता.२४) एमआयडीसी परिसरात घडली. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. महावितरणमध्ये वायरमन म्हणून किरण सपकाळे कामाला होते. शनिवारी (ता.२४) एमआयडीसी परिसरातील भारत पेट्रोलियम प्लांटपासून काही अंतरावर असलेल्या दुरुस्तीचे काम करण्यासाठी ते खांबावर चढले होते. वीज खंडित करण्याचा रितसर परवाना घेतला असताना खांबावर काम करताना नेमके त्याच वेळी वीजप्रवाह सुरू होता. त्यांना अचानक विजेचा जोरदार धक्का लागला व ते खाली पडले. चौकट चौकशीची मागणी सहकाऱ्यांनी त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले. खांबावर काम करण्यासाठी वीजपुरवठा खंडित करण्याचे परमिट घेतलेले होते. तरी वीजपुरवठा सुरू झाला व ही घटना घडली, अशी माहिती रुग्णालयात मृताच्या मित्रांनी दिली. वीजपुरवाठा पूर्ववत कसा सुरू झाला, याची चौकशी होऊन संबंधितांवर कारवाईची मागणी करण्यात आली. घटनेची माहिती मिळताच कर्मचारी, मित्र परिवार यांची रुग्णालयात गर्दी झाली होती. मृताच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prithviraj Chavan : मनोज जरांगे-पाटलांचे नेतृत्व संपवायचे त्याचवेळी एकनाथ शिंदे यांच्यासारख्या नेत्यांना बदनाम करण्याचा कुटील डाव

CBI Arrests ED officers : दुसऱ्यांवर धाडी टाकणाऱ्या ED अधिकाऱ्यांवरच CBI ची झडप! केसमधून वाचवण्यासाठी केला होता 'हा' मोठा सौदा

Andhra Politics: भाचीच्या लग्नात मामाचाच खोडा; चंद्राबाबू नायडू कोणाला म्हणाले ‘कंसमामा’?

''पाकिस्तान आमचं संरक्षण करतोय, भारताकडून आता अपेक्षा नाही'', माजी मुख्यमंत्र्याच्या विधानानं खळबळ

Latest Marathi News Live Update : मतचोरीचा मुद्दा भरकटवण्यासाठी जरांगे पाटलांची ऑडिओ क्लिप बाहेर-नाना पटोले

SCROLL FOR NEXT