कोळसा sakal
नाशिक

नाशिक : महानिर्मितीला भेडसावतोय कोळसा तुटवडा

कोराडीचा एक संच करणार बंद

सकाळ वृत्तसेवा

एकलहरे : उन्हाळ्यामुळे विजेची मागणी वाढली आहे. मात्र, महानिर्मितीला कोळशाचा तुटवडा जाणवत आहे. कोराडी येथील ६६० मेगावॉट संच क्रमांक १० हायड्रो जेटिंगसह कंडेन्सर ॲसिड क्लिनिंग आणि इतर कामांसाठी ८ ते २४ एप्रिलपर्यंत बंद ठेवण्यात येणार होता; पण तो कोळसा तुटवड्यामुळे आज माध्यरात्रीच बंद करण्यात येणार आहे.

मार्चएंडपासूनच उन्हाच्या तीव्र झळा महाराष्ट्राला बसू लागल्या होत्या. त्यामुळे विजेची मागणी वाढली आहे. महानिर्मिती ९२०० मेगावॉटची वीजनिर्मिती करीत आहे. मात्र, कोळसा तुटवड्यामुळे येत्या काळात आणखी संच बंद ठेवण्याची वेळ येते की काय, हे येणारा काळच ठरवेल.

चंद्रपूर, खापरखेडा वगळता सर्व वीज केंद्रांत दोन-तीन दिवसांचा कोळसा शिल्लक असून, रोज सहा लाख टनापर्यंत कोळसा उपलब्ध होतो. कोळसा तुटवड्यामुळे महानिर्मितीचे परळी येथील संच क्रमांक ६ बंद आहे. कोराडी येथील संच क्रमांक १० बंद ठेवण्यात येणार आहे. बुधवारी (ता. ६) दुपारी चारला नाशिक २७८ मेगावॉटचा एक संच बंद, कोराडी- १५४३ मेगावॉट, खापरखेडा- १००३, पारस- ३८०, परळी- ३२०, चंद्रपूर- २२३६ मेगावॉट, भुसावळ- ७९३ मेगावॉट, तर जल विद्युत कोयना १ व २- ५२०, कोयना संच ३- ३११, कोयना संच ४- ९८२, केडीपीएच- ३५, तिल्लारी- ५८ मेगावॉट व सोलरचे साक्री १- २२, साक्री २- २२, शिरसूफळ- २४ मेगावॉट, अशी एकूण ९२०५ मेगावॉट वीजनिर्मिती सुरू होती.

  • ७१९० - चंद्रपूर

  • २३३४७ - कोराडी

  • ३८७७ - खापरखेडा

  • ३४४१३ - एकूण

''कोळसा तुटवड्याला सामोरे जात असताना, कोल स्टॉक सहा लाखांवरून साडेसहा लाख एवढा वाढविला आहे. पावसाळ्यासाठी १५ लाख टन साठा करण्याचे उद्दिष्ट आहे.''

-पुरुषोत्तम जाधव, संचालक, खनिकर्म

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Playoff Scenario: श्रेयस अय्यरचे शतक, जिंकूनही पंजाब किंग्सची प्ले ऑफमधील जागा पक्की नाहीच... जाणून घ्या समीकरण

IPL 2026 KKR Playoff Scenario : कोलकाता नाइट रायडर्ससमोर अवघड गणित! पंजाबला नेट रन रेटमध्ये मागे टाकायचे असेल तर...

थायलंडला जाणं महागणार! भारतीयांसाठी Visa Free Entry रद्द; नवीन नियम लागू, आता प्रवेश कसा मिळणार?

Arjun Tendulkar: अर्जुनसोबत चुकीची वागणुक, त्यात रिषभ पंतने 'पारा' चढवला... सचिनचा मुलगा संतापला; नेमकं काय घडलं?

Monsoon Progress Update : मॉन्सूनची प्रगती हवामान विभागाचा दुजोरा, काही तासात केरळात दाखल; अरबी समुद्राचा भाग व्यापला

SCROLL FOR NEXT