नाशिक

जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या तक्रारींचा निपटारा आता ४५ दिवसांत!

CD
ॲंकर ------- लोगो : जळगाव जिल्हा परिषद इमारत --------------------------- कर्मचारी तक्रारींचा निपटारा आता ४५ दिवसांत! ------ दर सोमवारी आढावा : प्रशासनाची सेवाविषयक प्रश्नांसाठी नवीन कार्यपद्धती सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता.१८ : जिल्हा परिषदांमधील वर्ग तीन व चार कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक सेवाविषयक प्रकरणांमध्ये होणारा विलंब टाळण्यासाठी राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने महत्त्वाचे निर्देश जारी केले आहेत. त्‍यानुसार ४५ दिवसांत या प्रकरणांचा निपटारा करणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्‍यानुसार जिल्हा परिषद व विभागीय आयुक्तस्तरावर निश्चित नवीन कार्यपद्धती राबविण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांच्या सेवाविषयक बाबी वारंवार शासनाकडे पाठविण्याऐवजी मुख्य कार्यकारी अधिकारी व विभागीय आयुक्तांनी आपापल्या अधिकार क्षेत्रातच त्यांचा निपटारा करावा, असेही ग्रामविकास विभागाने स्पष्ट केले आहे. प्रशासकीय स्तरावरच तक्रारींचे निराकरण झाल्यास कर्मचाऱ्यांना न्याय मिळविण्यासाठी वारंवार कार्यालयात यावे लागणार नाही. तसेच सेवाविषयक प्रश्नांवरून थेट न्यायालयात जाण्याची वेळ येऊ नये, हा या कार्यपद्धतीमागील उद्देश असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे. सोमवारी वेळ राखीव वर्ग तीन व चारच्या कर्मचाऱ्यांच्या सेवाविषयक अडचणी, अर्ज व तक्रारी ऐकून घेण्यासाठी संबंधित जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दर सोमवारी दुपारच्या सत्रात एक तास राखून ठेवावा, असे शासनाने आदेशात स्पष्ट केलेले आहे. प्राप्त अर्जांवर विहित कालावधीत ठोस कार्यवाही करणे व झालेल्या निर्णयाची माहिती संबंधित कर्मचाऱ्याला लेखी स्वरूपात देणे बंधनकारक असेल. प्रकरणे अनावश्यकपणे प्रलंबित राहू नयेत, यासाठी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दर महिन्याला अशा प्रकरणांचा आढावाही घ्यायचा आहे. --------- इन्‍फो अपिलावर दीड महिन्यात निर्णय विभागीय आयुक्तांच्या अधिकार क्षेत्रातील प्रकरणे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी स्पष्ट अभिप्रायासह १५ दिवसांच्या आत विभागीय आयुक्तांकडे पाठवायची आहेत. दरम्‍यान, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या निर्णयाविरुद्ध कर्मचाऱ्याने विभागीय आयुक्तांकडे अपील दाखल केल्यास त्यावर दीड महिन्यात दिवसांत योग्य कार्यवाही करून निर्णय द्यावा, असे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे तक्रार दाखल करण्यापासून ते अपिलावरील अंतिम निर्णयापर्यंतची प्रक्रिया अधिक कालबद्ध करण्याचा प्रयत्न आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Election Voting Percentage : गोकुळसाठी ९९.९६ % मतदान; सतेज पाटील, हसन मुश्रीफांची प्रतिष्ठा पणाला, उद्या मतमोजणी, कोण मारणार बाजी?, तालुका निहाय आकडेवारी

Gokul Milk Union Election 2026 : गोकुळच्या मतदान केंद्रावर सुरक्षा व्यवस्थेचे तीनतेरा; मतपत्रीकेचे फोटो व्हायरल, नजर चुकवून मोबाईलवर काढले फोटो

Tukaram Munde Viral Video : तुकाराम मुंढेंचा VIDEO व्हायरल; ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याच्या मागणीशी संबंध काय?

मुंबईत नोकरी मिळाली, जॉइनिंग करण्याआधीच आक्रीत घडलं, २३ वर्षीय तरुणीला नराधमाने संपवलं, पुलावरून ओढत नेत...; कुडाळमध्ये काय घडलं?

Latest Marathi News Live Update : जळगावच्या कुंभारीत पोलीस प्रशिक्षण केंद्र, जामनेरमध्ये मुलींचे वसतिगृह; मंत्री अशोक उइके यांची घोषणा

SCROLL FOR NEXT