Exports have come to break due to heavy loss of vineyards nashik news sakal
नाशिक

Nashik Unseasonal Rain Damage : अवकाळीचा द्राक्ष निर्यातीलाही तडाखा; धुक्यामुळे द्राक्षमण्यांवर रोगाची शक्यता

सकाळ वृत्तसेवा

Nashik Unseasonal Rain Damage : द्राक्षपंढरी असलेल्या नाशिक जिल्ह्याला अवकाळी पाऊस, गारपीट व ढगाळ वातावरणाचा फटका बसला असून, जिल्ह्यातून होणारी द्राक्षांची निर्यात थांबली आहे.

दरवर्षी एकट्या नाशिक जिल्ह्यातून सर्वाधिक द्राक्ष निर्यात होत असे मात्र, अवकाळीमुळे द्राक्षबागांचे मोठे नुकसान झाल्याने निर्यातीला ‘ब्रेक’ बसला आहे. (Exports have come to break due to heavy loss of vineyards nashik news)

निर्यातीसाठी असलेल्या ग्रेपनेट प्रणालीवर जिल्ह्यातून होणारी निर्यातीसाठीची नोंदणी यंदा निम्म्यावर आली आहे, हे विशेष. सध्या कोल्ड स्टोअरेजमध्ये असलेल्या द्राक्षांना कॅगिंगची भीती आहे. तयार होण्याच्या मार्गावरील द्राक्षाला अवकाळीचा फटका बसल्याने निर्यातीवर परिणाम झाला.

मागील हंगामात एकट्या नाशिक जिल्ह्यातून सहा हजार ७९६ कंटेनरमधून जवळपास ९० हजार ४९३ टन द्राक्ष निर्यात झाली होती. संपूर्ण देशातून एक लाख ६९ हजार ६५० टन द्राक्ष निर्यात झाली होती, यातून एक हजार ५८६ कोटी रुपयांचे परकीय चलन देशाला मिळाले होते. यंदा त्याला मोठा ‘ब्रेक’ लागणार आहे.

राज्यातून सात हजार ४५८ प्लॉटची नोंदणी

द्राक्ष निर्यातीला चालना देण्यासाठी तसेच युरोपियन देशांत होणाऱ्या निर्यातीकरिता रासायनिक अंशमुक्त द्राक्षाच्या निर्यातीसाठी ‘अपेडा’च्या ‘ग्रेपनेट’ प्रणालींतर्गत नोंदणी करण्यात येते. २०२३-२४ च्या हंगामाकरिता निर्यातक्षम द्राक्षबागांची नोंदणी बंधनकारक करण्यात आली आहे.

या हंगामासाठी ५ डिसेंबरपर्यंत महाराष्ट्रासह कर्नाटक मिळून सात हजार ४६६ प्लॉटची नोंदणी झाली असून, यापैकी सात हजार ४५८ प्लॉटची नोंदणी एकट्या महाराष्ट्रातून झाली. केवळ आठ प्लॉटची नोंदणी कर्नाटकमधून झाली. गेल्या वर्षीच्या तुलनेत द्राक्षबाग नोंदणीही निम्म्याहून अधिक घटली आहे.

दाट धुक्याचा मणीवर परिणाम

भारतात द्राक्ष उत्पादनात महाराष्ट्राचा प्रथम क्रमांक आहे. जिल्ह्यात जवळपास ६० हजार हेक्टर क्षेत्रावर द्राक्षांची लागवड केली जाते. निर्यात सुरू होण्यास अजून १५ ते २० दिवस लागतील, अशी माहिती द्राक्ष निर्यातदारांनी दिली.

मात्र, दुसरीकडे तीन दिवसांपासून मोठ्या प्रमाणात धुके पडते आहे. सकाळी आठपर्यंत हे धुके कायम राहत असल्याने शेतकरी धास्तावले आहेत. या धुक्यामुळे द्राक्ष मण्यांवर भुरी रोगाचा प्रादुर्भाव वाढण्यास पोषक वातावरण तयार होत आहे. एकूणच, द्राक्ष बागायतदारांसमोर संकटाचे वादळ घोंगावत राहणार असल्याचे दिसते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Khambatki Ghat Traffic Jam : खंबाटकी घाटात ST बस ठप्प; विकेंडला पुणे-सातारा महामार्गावर भीषण ट्रॅफिक कोंडी!

अवघ्या ६ महिन्यात संपणार स्टार प्रवाहची लोकप्रिय मालिका? 'त्या' पोस्टमुळे चर्चांना उधाण, 'या' मालिकेची वेळ बदलली

IPL 2026 Point Table: दिल्ली कॅपिटल्सने घरात घुसून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला नमवले; डेव्हिड मिलरने ३ चेंडूंत फिरवली मॅच, गुणतालिकेत बदल

Phulambri News : शेतकऱ्यांच्या शेतातच मृत्यूचा सापळा..! लोंबकाळणाऱ्या वीजतारांनी वाढवला धोका; महावितरण विभागाचे दुर्लक्ष

Doordarshan Veteran Passes Away: दूरदर्शनच्या सुवर्णकाळावर मोहोर उमटविणारे ज्येष्ठ निर्माते, दिग्दर्शक अरुण काकतकर काळाच्या पडद्याआड

SCROLL FOR NEXT