नाशिक

वैद्यकीयच्या विद्यार्थ्यांना अतिरिक्त परीक्षेची संधी

CD
वैद्यकीयच्या विद्यार्थ्यांना अतिरिक्त परीक्षेची संधी महाराष्ट्र आरोग्‍य विज्ञान विद्यापीठाच्‍या निर्णयाने मिळेल दिलासा सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. २१ : राज्यातील वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रथम वर्षात उत्तीर्ण होण्यासाठी अतिरिक्त परीक्षेची संधी उपलब्ध करून दिली आहे. यासाठी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. व्यंकट गिते यांनी पुढाकार घेतला असून, या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे. निर्णयाबाबत कुलगुरू डॉ. गिते म्‍हणाले, की विद्यार्थ्यांना विविध आरोग्याशी संबंधित समस्या आणि इतर वैयक्तिक अडचणींमुळे तसेच अपवादात्मक परिस्थितीमुळे अभ्यागत अनेक अडथळे आल्याने परीक्षा उत्तीर्ण होऊ शकले नाहीत. यासाठी राष्ट्रीय वैद्यकीय आयोग यांच्याकडे विनंती केली होती. वैद्यकीय शिक्षणातील विद्यार्थ्यांना प्रथम वर्षात उत्तीर्ण होण्यासाठी अतिरिक्त परीक्षेची संधी उपलब्ध करून द्यावी, यासाठी वेळोवेळी प्रयत्न केले. या अनुषंगाने नुकताच राष्ट्रीय वैद्यकीय आयोग व पदवी वैद्यकीय शिक्षण मंडळाने विद्यार्थ्यांना दिलासा देताना अतिरिक्त एक संधी वाढवून दिली आहे. यासाठी पूर्वी चार संधी दिल्‍या जायच्‍या. आता एक अतिरिक्‍त संधी उपलब्ध झाल्याने विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान टाळता येईल. विद्यार्थ्यांनी अभ्यासासाठी केलेले परिश्रम, मानसिक ताण, आर्थिक भार यातून विद्यार्थ्यांना दिलासा मिळेल, या हेतूने निर्णय घेतल्‍याचे नमूद केले आहे. कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ म्‍हणाले, की राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाकडे विद्यापीठाकडून पाठपुरावा केला. विद्यार्थ्यांच्या हितासाठी सकारात्मक निर्णय घेण्यासाठी विद्यापीठ प्रशासन कायम प्रयत्नशील राहील. इन्‍फोः ‘त्‍या’ विद्यार्थ्यांना होणार फायदा नॅशनल मेडिकल कौन्सिलच्या नियमानुसार विद्यार्थ्याने एमबीबीएसचा अभ्यासक्रम हा इंटर्नशिपसह दहा वर्षांच्या आत पूर्ण करणे बंधनकारक आहे. प्रथम वर्ष प्रवेशापासून चार प्रयत्नांमध्ये किंवा चार वर्षांच्या आत उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. शैक्षणिक वर्ष २०१९-२० आणि २०२०-२१ या दोन बॅचेसना कोविडच्या प्रार्दुभावामुळे विशेष बाब म्हणून पाचवा प्रयत्न दिला होता. नॅशनल मेडिकल कौन्सिलच्या नुकत्याच झालेल्या बैठकीतील निर्णयानुसार शैक्षणिक वर्ष २०१९-२० बॅचपासून पुढील सर्व बॅचेसमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना एक विशेष ‘दया संधी’ दिली जाईल. म्हणजेच एकूण पाच प्रयत्न त्‍यांना करता येतील. यामध्ये चार नियमित आणि एक ‘दया संधी’ असेल. इन्‍फो ‘त्यांना’ योजना लागू राहणार नाही या निर्णयामुळे विद्यार्थ्याने वैद्यकीय शिक्षणाचा अभ्यासक्रम हा इंटर्नशिपसह दहा वर्षांच्या आत पूर्ण करणे बंधनकारक राहील. ही एक वेळची विशेष उपाययोजना असून, कायमस्‍वरूपीचा निर्णय घेतलेला नाही. त्‍यामुळे पुढील येणाऱ्या बॅचेसना ही योजना लागू राहणार नाही, असेही विद्यापीठाने स्‍पष्ट केले आहे.

Elon Musk: अंतराळात डेटा सेंटर, जमिनीवर एआयचा विस्तार! काय आहे एलॉन मस्क यांचा जगाला धडकी भरविणारा मास्टर प्लॅन?

आमचे हात बांधलेले नाहीत, निवडणूक प्रक्रियेत गडबड केल्यास शांत बसणार नाही, सर्वोच्च न्यायालयाची मोठी टिप्पणी!

Soybean Farm Fire : दुष्काळात कष्टाने जगवलेले पाच एकरवरील सोयाबीन जळून खाक; जाणीवपूर्वक आग लावल्याचा शेतकऱ्याचा संशय

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

अमरावतीत पोलीस शिपायाच्या मृत्यूने खळबळ; टोकाचं पाऊल उचलण्यापूर्वी लिहिली चिठ्ठी, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT