devlali camp nashik 
नाशिक

आर्मीचा गणवेश घालून शिरला आर्टिलरी कॅम्पमध्ये, नाशकात एकाला अटक

सकाळ डिजिटल टीम

नाशिकमध्ये विचित्र घटना समोर आली आहे. एक व्यक्ती आर्मीचा गणवेश घालून लष्कराच्या छावणीत घुसला. लष्करी अधिकाऱ्याच्या गणवेशात फिरणाऱ्या या तोतयाला अटक करण्यात आलंय. लष्करी हद्दीत फिरत असताना त्याच्या हालचालींवर संशय आला. (Fake Army Officer in Nashik)

त्यानंतर अधिकाऱ्यांनी त्याची चौकशी केली. यावेळी तो तोतया असल्याचं समोर आलं. देवळाली लष्कर कॅम्पच्या स्कूल ऑफ आर्टिलरीतील हा प्रकार आहे. (Nashik Army Camp)

गणेश बाळू पवार असं संबंधित व्यक्तीचं नाव आहे. तो याआधीही लष्कराच्या हद्दीत घुसला होता का, त्याचा छावणीत घुसण्याचा उद्देश काय होता, याबद्दल अद्याप खुलासा झालेला नाही.

गणेश बाळू पवार हा नाशिकच्या चांदवड तालुक्यातील हार्सोल गावचा रहिवासी आहे. गावातील तरुणांना लष्करात नोकरी लावण्याच्या बहाण्याने तो फसवणूकही करत होता. काल देखील अशाच स्वरुपाची फसवणूक करण्याच्या तो तयारीत होता.

लष्कराच्या जवानांनी त्यांच्या हालचाली आणि चालण्याची अदब ओळखली. यानंतर त्यांनी संबंधित व्यक्तीची चौकशी केली आणि हा खुलासा झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT