33471
कोंढावळ : मृत शेतकरी राजेंद्र खोंडे यांच्या कुटुंबीयांशी चर्चा करताना तहसीलदार संभाजी पाटील समवेत विनोद अहिरे, रत्ना ठाकरे आदी.
--------------------
तहसीलदारांनी घेतली आत्महत्याग्रस्त
शेतकऱ्याच्या कुटुंबीयांची भेट
वडाळी, ता. २४ : कर्जबाजारीपणामुळे जीवनयात्रा संपविणारे कोंढावळ येथील शेतकरी राजेंद्र खोंडे यांच्या कुटुंबीयांची तहसीलदार संभाजी पाटील यांनी शनिवारी (ता.२४) भेट घेत कुटुंबीयांना शासनाकडून आवश्यक ती मदत मिळण्यासाठी प्रशासन पाठपुरावा करेल, असे आश्वासन तहसीलदारांनी दिले.
कोंढावाळ (ता. शहादा) येथील शेतकरी राजेंद्र देवचंद खोंडे (वय ५५) यांनी ता. १४ ऑक्टोबर रोजी स्वतःच्या शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या घटनेची माहिती समजल्यानंतर घेण्यासाठी तहसीलदार संभाजी पाटील यांनी शनिवारी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या निवासस्थानी भेट देऊन कुटुंबीयांशी चर्चा करत समस्या जाणून घेतल्या. नियमानुसार शासनाच्या वतीने योग्य ती सर्व आर्थिक व प्रशासकीय मदत मिळवून दिली जाईल, असे आश्वासन तहसीलदार पाटील यांनी दिले.
यावेळी उपसरपंच विनोद अहिरे, कोतवाल रत्ना ठाकरे, भिकूबाई खोंडे (पत्नी), सागर खोंडे, किरण खोंडे, छोटू खोंडे (बंधू), गोपाल खोंडे, समाधान खोंडे (पुतण्या) आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.