नाशिक

चाळीसगाव बाजार समितीच्या पिलखोड संकलन केंद्रावर मका व अन्नधान्य लिलावाचा शानदार शुभारंभ

CD
टुडे एकसाठी CSG26B03027 पिलखोड (ता.चाळीसगाव) : येथील बाजार समितीत शेतकऱ्यांशी संवाद साधताना आमदार मंगेश चव्हाण. ----------------------------------------- शेतकरीहिताला शासनाचे सर्वोच्च प्राधान्य --- आमदार मंगेश चव्हाण : पिलखोड येथे मका, अन्नधान्य लिलावाचा शुभारंभ सकाळ वृत्तसेवा चाळीसगाव, ता. १७ : शेतकरीहिताला शासनाचे सर्वोच्च प्राधान्य आहे. शेतकऱ्यांचा मुख्य बाजारात शेतमाल विक्रीसाठी येणारा वाहतूक खर्च व इतर आर्थिक भुर्दंड कमी व्हावा, या उद्देशाने स्थानिक पातळीवर हे केंद्र सुरू करण्यात आले आहे. शेतकरीहिताचा हा महत्त्वपूर्ण निर्णय असून, त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे, असे प्रतिपादन आमदार मंगेश चव्हाण यांनी केले. चाळीसगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील पिलखोड येथे अन्नधान्य संकलन केंद्राच्या नवीन हंगाम २०२६-२७ चा शुभारंभ आमदार चव्हाण यांच्या हस्ते शनिवारी (ता.१७) नारळ वाढवून करण्यात आला, त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी लिलाव प्रक्रियेचा अधिकृत प्रारंभही करण्यात आला. विशेष म्हणजे लिलावाच्या पहिल्याच दिवशी मक्याला २,३०० ते २,७११ रुपये प्रतिक्विंटल इतका समाधानकारक भाव मिळाला. कांदा उपबाजार सुरू करणार या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात बाजार समितीचे सभापती किशोर पाटील म्हणाले की, शेतकऱ्यांची सोय हीच आमची प्राथमिकता आहे. पिलखोड परिसरातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांची गरज लक्षात घेता, आगामी काळात येथे कांदा उपबाजार सुरू करण्याचा बाजार समितीचा मानस आहे, जेणेकरून शेतकऱ्यांना आपला कांदा विक्रीसाठी लांब जावे लागणार नाही. यांची होती उपस्थिती या कार्यक्रमाला बाजार समितीचे उपसभापती राहुल पाटील, कपिल पाटील, बाजार समितीचे संचालक प्रभाकर जाधव, हेमराज बाविस्कर, शैलेश पाटील व विनोद घुमरे, पंचक्रोशीतील शेतकरी उपस्थित होते. सूत्रसंचालन बाजार समितीचे सहसचिव सतीश पाटील यांनी केले. कार्यक्रमासाठी शशिकांत अडकमोल, भाऊसाहेब सोनवणे, अरुण शिरसाठ यांनी परिश्रम घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolkata Stamped: कोलकात्यात दुर्गापूजा मंडपात चेंगराचेंगरी; १७ भाविकांचा मृत्यू

IND vs WI 5th T20I: भारत-वेस्ट इंडिज पाचव्या सामन्याचा निकाल लागला... ९-९ षटकांचा सामना नेमका कुणी जिंकला?

Resort Fire Tragedy : पर्यटकांच्या रिसॉर्टला भीषण आग; एकाच कुटुंबातील ५ जणांसह १० पर्यटकांचा होरपळून मृत्यू, ९ गंभीर!

Couple Found Dead: पत्नीच्या वाढदिवशीच 'त्या' दोघांनी संपविले जीवन; 'आम्ही जग सोडतोय...!' कोणाला पाठवला ईमेल?

IND vs WI 5th T20I: इशान किशनचे वादळ, मोडला विक्रम; भारताने ९ षटकांच्या मॅचमध्ये किती धावा केल्या? पावसाने पुन्हा घोळ घातला

SCROLL FOR NEXT