नाशिक

गंगापूर व आळंदी धरण शेतीसाठीच,

CD
OZM26B14934 सिद्धपिंप्री ः येथे गंगापूर व आळंदी धरण शेतीसाठीच पाण्यासाठी एकवटलेले शेतकरी ------------- गंगापूर, आळंदीचे धरण शेतीसाठीच --------- सिद्ध पिंपरी येथे झालेल्या पाणी परिषदेत शेतकरी आक्रमक सकाळ वृत्तसेवा ओझर, ता.२३ ः नाशिक जिल्ह्यातील गंगापूर व आळंदी धरणाची निर्मिती शेतीसाठीच झाल्याने या पाण्यावर सर्वप्रथम शेतकऱ्यांचा हक्क आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे पाणी हे मिळालेच पाहिजे, असा आक्रमक पवित्रा सिद्ध पिंपरी येथे झालेल्या पाणी परिषदेत शेतकऱ्यांनी घेतला. धरणातील पाण्यासंदर्भात नियोजन समितीची बैठक न झाल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. गंगापूर डाव्या तट कालव्याला किमान सहा रोटेशन मिळाले पाहिजे. पहिले रोटेशन २५ ऑक्टोबरपासून सुरू करण्यात यावे. सर्व शेतकऱ्यांनी नमुना नंबर सातवर पाणी मागणी नोंदवून पाणीपट्टीचे पास फाडून घ्यावेत. कालव्यावर अवलंबून असलेल्या सात ते आठ ग्रामपंचायतीचा पाणीपुरवठा लक्षात घेऊन सिंचन व बिगर सिंचनाचे रोटेशन एकत्रितपणे नियोजित करावे. वेगवेगळे रोटेशन करू नये. द्राक्ष बागा व इतर फळबागा वाचवण्यासाठी पाण्याचे योग्य नियोजन करावे, चारा उपलब्ध व्हावा. आळंदी डावा तट कालव्याला खरीप हंगामात तीन पाणी रोटेशन आणि उन्हाळी हंगामात दोन पाणी रोटेशन मिळाले पाहिजे. बैठकीतील सर्व मागण्यांचे कार्यकारी अभियंता तसेच पालकमंत्री गिरीश महाजन यांना निवेदन देऊन पाठपुरावा करण्याचे शेतकऱ्यांच्या बैठकीत ठरले आहे. बैठकीला विविध पाणी वापर संस्थांचे अध्यक्ष, संचालक आणि दहा गावातील लोकप्रतिनिधी उपस्थित होते. शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल ढिकले, नाशिक जिल्हा शेतकरी संघटना अध्यक्ष अर्जुन बोराडे, शेतकरी संघटना कार्याध्यक्ष शंकरराव ढिकले, जयराम ढिकले, सोसायटी अध्यक्ष अंबादास ढिकले, खेरवाडी शिवांजली पाणी वापर संस्थेचे अध्यक्ष रमेश संगमनेरे, बाबाजी संगमनेरे, रमेश संगमनेरे, अनिल आवारे, नारायण संगमनेरे, गणेश लांडगे, काशिनाथ संगमनेरे आदी शेतकरी उपस्थित होते. ------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Price fall before Dhanteras Diwali : धनत्रयोदशी-दिवाळीपूर्वी सोनं-चांदी स्वस्त! एकाच झटक्यात दरात मोठी घसरण; खरेदीपूर्वी जाणून घ्या ताजे भाव..!

Maharashtra weather cyclone update : बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाचा भडका; महाराष्ट्रात ऐन दिवाळीत पाऊस खोडा घालणार? हवामान विभागाचा मोठा इशारा!

Marathi News Live Updates: नाशिकमध्ये कांद्याने भरलेला पिकअप पलटी, दुचाकीस्वार गंभीर जखमी

Data Security : डेटा सुरक्षेत हलगर्जी भोवणार; आस्थापनांवर दंडाची टांगती तलवार; सहकारी बॅंका आणि पतसंस्थांनाही नियमावली लागू

IND W vs ZIM W: प्रतिका रावलचं शतक अन् शेफाली वर्माची वादळी खेळी! झिम्बाब्वेला लोळवत भारतीय महिलांचा ९ विकेट्सने दणदणीत विजय

SCROLL FOR NEXT