नाशिक

सणासुदीच्या तोंडावर महागाईचा भडका

CD
सणासुदीच्या तोंडावर महागाईचा भडका तांदूळ, डाळी आणि धान्याचे दर कडाडले; बजेट कोलमडले सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. १७ : बाजारात अन्नधान्य, डाळी आणि जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत मोठी वाढ झाल्याने सर्वसामान्य नागरिकांचे मासिक बजेट पुरते कोलमडले आहे. दुष्काळी परिस्थिती, सणासुदीची चाहूल आणि व्यापाऱ्यांकडून होणारी संभाव्य साठेबाजी यामुळे अन्नधान्याच्या बाजारपेठेत भाववाढ पाहायला मिळत आहे. येत्या काही दिवसांत ही दरवाढ अशीच कायम राहिल्यास परिस्थिती अधिक गंभीर होण्याची भीती व्यक्त केली जाते आहे. गेल्या महिन्यापर्यंत किरकोळ बाजारात ६० रुपये किलोने मिळणारा इंद्रायणी व जिरा राईस तांदूळ आता थेट ८० रुपये प्रतिकिलोवर पोहोचला आहे. येत्या २० ते २५ दिवसांत हाच दर शंभर रुपये किलोपर्यंत जाण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. डाळींच्या दरांमध्येही वाढ नोंदविली आहे. तूरडाळीने प्रति किलो १६० ते १६५ रुपयांचा टप्पा गाठला आहे. याशिवाय मूगडाळ आणि हरभरा डाळीच्या दरातही प्रति किलो २० ते ३० रुपयांची मोठी वाढ नोंदवली गेली आहे. डाळींप्रमाणेच गव्हाच्या दरामध्ये सुमारे २० टक्क्यांची वाढ झाली आहे. किरकोळ बाजारात ३५ रुपये किलोने विकला जाणारा गहू सद्यःस्‍थितीत ४० रुपयांवर पोहोचला आहे. दुसरीकडे, बाजारात ज्वारीची आवक प्रचंड घटल्याने, उपलब्‍धतेचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. साखरेच्या दरातही पुन्हा वाढ सुरू झाली असून ४९ ते ५० रुपयांवरून साखर आता ६० रुपयांवर गेली आहे. विविध प्रकारच्‍या तेलांच्‍या दरांमध्ये पाच ते दहा टक्क्‍यांपर्यंत भाववाढ झालेली आहे. नवरात्रोत्‍सव पाठोपाठ वर्षातील सर्वात मोठा सण दिवाळी येऊ घातली आहे. या सणानिमित्त फराळाचे पदार्थ बनविण्यासाठी किराणा मालाला मोठी मागणी होत असते. अशा परिस्थितीत सध्याच्‍या महागाईमुळे सण कडवट झाल्‍याची अनुभूती नागरिक घेत आहेत. ----------चौकट तांदुळाची आवक घटली यंदा दुष्काळाच्‍या परिस्थितीमुळे तांदुळाची आवक मोठ्या प्रमाणात घटली आहे. त्यामुळे महिन्‍याभरात दरांमध्ये साधारणतः २० टक्क्‍यांपर्यंत वाढ झाली आहे. पुढील काही महिने तुटवडा कायम राहणार असल्‍याने दरवाढीची दाट शक्‍यता निर्माण झाली आहे. ---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI 5th T20I: चिन्नास्वामीवर Fire Alarm वाजला, भारतीय क्रिकेटपटूच्या फोनवर Emergency Alert अन्...; नेमकं काय घडलं?

Gangapur News : न्यायालयीन कर्मचाऱ्यांचा आंदोलनाचा इशारा; गंगापूरमध्ये कर्मचाऱ्यांचे काळ्या फिती लावून कामकाज

Abhijit Dipke: अभिजीत दिपकेंना दिलासा; सशर्त जामीन मंजूर करताना न्यायालयाने काय घातली अट?

Shivneri Kabaddi Tournament: अजिंक्य-साईच्या जोरावर रिजनल स्पोर्ट्स बोर्डाची तिसऱ्या फेरीत धडक, माटुंगा वर्कशॉपचा उडवला धुव्वा

Latest Marathi News Live Update : ग्राहक महिलेने लांबविले मंगळसूत्र श्रीरामपूर येथील घटना; पोलिसांत तक्रार दाखल

SCROLL FOR NEXT