money esakal
नाशिक

अनुसूचित जातीतील कुटुंबांना ‘स्माइल’ योजनेतून अर्थसहाय्य

अरूण मलाणी

नाशिक : कोरोनामुळे (corona) अनुसूचित जातीच्या कुटुंबप्रमुखाचे निधन झाल्यास अशा कुटुंबांचे पुनर्वसन करण्यासाठी नवी दिल्‍लीतील एनएसएफडीसी यांच्या माध्यमातून योजना राबविली जात आहे. या योजनेंतर्गत महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळामार्फत व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी ‘स्माइल’ योजना (smile scheme) सुरू केली आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित कुटुंबातील व्यक्तीने बुधवार (ता. ३०)पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन नाशिक महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या जिल्हा व्यवस्थापकांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे. (Financial-assistance-to-SC-families-through-Smile-scheme-nashik-marathi-news)

पुरावा आदी कागदपत्रे सादर करणे आवश्यक

प्रसिद्धीपत्रकात म्‍हटले आहे, की कोरोनामुळे १५ जूनपर्यंत मृत्यू झालेल्या अनुसूचित जातीतील कुटुंबांना या योजनेंतर्गत व्यवसाय करण्यासाठी कर्ज उपलब्‍ध होईल. एक ते पाच लाखांपर्यंत ६ टक्‍के व्‍याजदाराने सहा वर्षांकरिता कर्ज दिले जाईल. त्यासाठी अर्जदाराने महामंडळाच्या जिल्हा कार्यालयात अथवा https://forms.gle/7mG8CMecLknWGt6K7 या संकेतस्थळावर अर्ज सादर करावेत. अर्ज सादर करताना अर्जदाराने मृत व्यक्तीचे नाव व पत्ता, आधारकार्ड, उत्पन्नाचा दाखला (तीन लाखांपर्यंत), कोरोनामुळे मृत्‍यू झालेल्‍या व्यक्तीचा मृत्यू दाखला, रेशनकार्ड, वयाचा पुरावा आदी कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे.

असे आहेत निकष

अर्जदार अनुसूचित जातीतील असावा. अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न तीन लाख रुपयांपर्यंत असावे. अर्जदार कोरोनामुळे मृत्यू झालेल्‍या कुटुंबप्रमुखाच्या कुटुंबातील सदस्य असावा. शिधापत्रिकेत नाव असणे बंधनकारक आहे. मृत व्यक्तीचे वय १८ ते ६० दरम्यान असावे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या संबंधित व्यक्तीचे महापालिका व पालिकेने दिलेले मृत्यू प्रमाणपत्र अथवा स्मशानभूमी प्राधिकरणाने दिलेली पावती किंवा एखाद्या गावात स्मशानभूमी नसल्यास गटविकास अधिकाऱ्याने दिलेले मृत्यू प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM kisan 22nd Installment : पंतप्रधान मोदी आज 'पीएम किसान' चा २२ वा हप्ता जारी करणार; तुमच्या खात्यात पैसे येणार की नाही? असं चेक करा

Parbhani Gas Booking Trouble: गॅस सिलिंडर बुकिंग सर्व्हर डाउन, ऑनलाइन नोंदणी ठप्प, परभणी गॅस एजन्सी गर्दी

बोर्डाचे शिक्षकांना आदेश! दहावी-बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणी शाळेतच बंधनकारक; २१ दिवसांसाठी २१ दिवसांची मुदत, आता उत्तरपत्रिकांचे गठ्ठे इतिहासजमा

Sunetra Pawar: यशवंत विचारांनीच कायम वाटचाल करणार: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, कऱ्हाडला बाळासाहेब पाटील यांना काय म्हणाल्या?

मोठी बातमी! उजनी धरणातून शेतीसाठी २० मार्चनंतर सुटणार सलग ८० दिवस पाणी; कालवा सल्लागार समितीची पुढील आठवड्यात बैठक, वाचा...

SCROLL FOR NEXT