Pre monsoon in yeola esakal
नाशिक

नाशिक : मॉन्सून पूर्व पहिल्या पावसाने सुखावले येवलेकर

संतोष विंचू

येवला (जि. नाशिक) : येवला शहरासह तालुक्यात आज (ता.३१) सायंकाळी झालेल्या मान्सूनपूर्व (Pre Monsoon Rains) पहिल्या पावसाने येवलेकर सुखावले आहेत. (first pre monsoon rains in yeola Nashik News)

या पावसामुळे उष्णतेतून (Heat) सुटका मिळाली असून वेळेत पाऊस पडण्याचे संकेत देखील मिळाले आहेत. मागील आठवड्यापासून वातावरणातील उष्णता कमालीची घटली आहे. यामुळे गारव्याचा आनंद घेतानाच हवामान विभागासह काही अभ्यासकांनी पावसाचा अंदाज वर्तविला होता. त्यानुसार आज सकाळपासूनच वातावरणात प्रचंड उष्णता असल्याने पाऊस हजेरी लावेल, अशी ही शक्यता होती. दुपारनंतर ढगाळ हवामान (Cloudy Weather) होऊन प्रारंभी पाच वाजेच्या सुमारास राजापूर, नगरसुल, सायगाव भागात पावसाने हजेरी लावली तर सहा वाजेनंतर येवला शहरात सुमारे पंधरा मिनिटे जोराच्या सरी कोसळल्या. या पावसामुळे सर्वत्र गारवा निर्माण होऊन आल्हाददायक वातावरण तयार झाल्याने गेल्या चार महिन्यांपासून उष्णतेचा सामना करणाऱ्या येवलेकरांना आज काहीसे हायसे वाटले.

दरम्यान अचानक आलेल्या पावसामुळे कांदा उत्पादकांची मात्र मोठी धावपळ झाली. शेतकऱ्यांनी चाळीत कांदा साठविला असला तरी बहुतांशी शेतकऱ्यांचा कांदा झाडाखाली किंवा घराच्या आजूबाजूला पोळ बनवून ठेवलेला आहे. या कांद्याची पोळ झाकताना शेतकऱ्यांची धावपळ उडाल्याचे दिसले. हलकासा वारा देखील असल्याने काही ठिकाणी झाडांच्या फांद्या व झाडे उन्मळून पडल्याच्या घटना घडल्या आहेत. वातावरणात विजांचा गडगडाट अल्पसा होता. पाऊस उघडल्यानंतर गार हवा सुटल्याने वातावरणात कमालीचा बदल झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Sarpanch News : सरपंचांचे अधिकार संपले?, फडणवीस सरकारचा निर्णय; मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासकांना अधिकार

प्रौढ बेपत्ता झाल्यास आता अपहरणाचा गुन्हा, नवी मुंबईत पहिली कारवाई; सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांची अंमलबजावणी

Leopard Attack Junnar : औषध फवारणीचा पंप ठरला ढाल; बिबट्याच्या हल्ल्यातून शेतकरी दाम्पत्य थोडक्यात बचावले

Marathi News Live Updates : “एकनाथ शिंदे यांना मराठ्यांमध्येच मारामाऱ्या लावून दंगल घडवायची आहे", जरांगे यांचा गंभीर आरोप

Thane: ९५ टक्के मिळूनही आवडतं कॉलेज नाही, नैराश्यात १७ वर्षीय विद्यार्थ्यानं जीवन संपवलं; घरच्यांना शेवटचा मेसेज पाठवत...

SCROLL FOR NEXT