नाशिक

खाद्यपदार्थ व्यवसायिकांना अन्नसुरक्षा व्यवस्थापन प्रणाली बंधनकारक: ज्ञानेश्वर महाले

CD
फोटो : B12988 इंदिरानगर : कार्यशाळेसाठी उपस्थित सहायक आयुक्त ज्ञानेश्वर महाले, विनोद धवड, सुनील फरांदे, डॉ. अपर्णा फरांदे यांच्यासह विविध आस्थापनांचे प्रतिनिधी -- व्यावसायिकांनी नियमांचे पालन करणे बंधनकारक महाले : इंदिरानगरला ‘अन्नसुरक्षा व्यवस्थापन’ प्रणालीवर कार्यशाळा इंदिरानगर, ता. २४ : अन्नसुरक्षा व मानके कायदा २००६ नुसार प्रत्येक नोंदणीकृत व परवानाधारक अन्न उत्पादक, हॉटेल, रेस्टॉरंट, केटरर्स व कँटीन व्यावसायिकांनी अन्नसुरक्षा व्यवस्थापन प्रणालीचा अवलंब करणे बंधनकारक आहे, असे मत अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त ज्ञानेश्वर महाले यांनी इंदिरानगर येथे व्यक्त केले. राज्याच्या अन्न व औषध प्रशासन विभागाच्या ‘सेफ फूड, सेफ महाराष्ट्र’ मोहिमेअंतर्गत नाशिक विभागाचे सहआयुक्त कार्यालय आणि इंदिरानगर येथील अश्वमेध प्रयोगशाळेतर्फे शुक्रवारी (ता. २३) ‘अन्नसुरक्षा व्यवस्थापन प्रणाली’ विषयावर अश्वमेध सभागृहात घेण्यात आलेल्या कार्यशाळेत ते बोलत होते. सहायक आयुक्त विनोद धवड, अश्वमेधच्या संचालिका डॉ. अपर्णा फरांदे, सुनील फरांदे यांची प्रमुख उपस्थिती होती. महाले म्हणाले, की बहुतांश ठिकाणी याचे पालन होत नसल्याचे निदर्शनास आल्याने संबंधित आस्थापनांवर कारवाई करण्यात आली आहे. धवड म्हणाले, की आगामी सणाच्या पार्श्वभूमीवर अन्नपदार्थ संबंधित सर्वच आस्थापनांनी सतर्क राहणे गरजेचे आहे. डॉ. फरांदे यांनी अन्नपदार्थाची चाचणी मान्यताप्राप्त प्रयोगशाळेतच का करावी याबाबत माहिती दिली. शेड्युल-४ नुसार अन्नपदार्थांचे उत्पादन हाताळणी साठवणूक व वितरण करताना अन्नसुरक्षा व्यवस्थापन प्रणालीचा कायद्यानुसार योग्य प्रकारे कसा अवलंब करावा याबाबत उल्का बेलन यांनी घ्यावयाच्या दक्षतेबाबत, तर दीपाली बोरावके यांनी ‘आयएसओ २२०००’ चे महत्त्व सांगितले. यावेळी दूध, मसाले, पनीर यातील भेसळ ओळखण्याचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. अन्न व्यावसायिकांच्या शंकांचे निरसन अधिकाऱ्यांनी केले. संस्थेचे संचालक सुनील फरांदे यांनी आभार मानले. कार्यशाळेसाठी विजय मुसळे, चंद्रकांत हांडगे, शुभम पाटोळे मनोज कोतकर, कृष्ण सोनवणे आदींसह शहर परिसरातील मोठे हॉटेल्स, फूड मार्ट , रेस्टॉरंट संघटना, केटरर्स संघटना, मिठाई- नमकीन उत्पादक संघटनेचे पदाधिकारी आणि संचालक उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ 2nd T20: ६ चेंडूंत ११ धावा, शेवटच्या चेंडूपर्यंत थरार! तिलक-नितीशने पलटवला सामना, भारताचा न्यूझीलंडवर दणदणीत विजय!

Piyush Goyal : पावभाजीची चव रोबोट देऊ शकणार नाही; वैभव सूर्यवंशीसारखा सिक्सरही नाही! कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मर्यादा आणि भारतातील संशोधनाच्या संधींवर पियुष गोयल यांची मांडणी

Pune News : औषधाच्या गोळीतून ब्लेडचे तुकडे खायला दिले; पतीस सात वर्षे सक्तमजुरीची शिक्षा, पत्नी फितूर होऊनही वैद्यकीय पुराव्यांवर निकाल

Share Market: ट्रेडिंग गुरु अवधूत साठेंला SEBIचा दणका! 546 कोटी परत करण्याचे आदेश, 67 कोटी व्याज अन् 11.5 कोटींचा दंडही भरावा लागणार

Latest Marathi News Live Update : पिंपरी-चिंचवडमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीवर चाकू हल्ला

SCROLL FOR NEXT